नाशिक सायक्लिस्टस् फाऊंडेशन, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड व लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १४) डिव्हाइन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या सायकल रॅली मध्ये 100 हुन अधिक दिव्यांग सायकलीस्ट सहभागी झाले होते. यात टॅण्डम सायकल, तीन चाकी सायकल, व्हीलचेअर अशा विविध प्रकारच्या सायकल वापरण्यात आल्या. सलग सहाव्या वर्षी या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
गंगापुर रस्त्यावरील जेहान सर्कल येथून रॅली सुरु झाली. पुढे प्रसाद चौक – विद्या विकास सर्कल ते कुसुमाग्रज स्मारक येथे समारोप करण्यात आला.
जेहान सर्कल येथे नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. सोबत नाशिक जिल्हा क्रीडाअधिकारी रवींद्र नाईक, नाशिक सायक्लिस्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, NABचे अध्यक्ष-रामेश्वर कलंत्री, गोपी मयुर, मंगला कलंत्री, मुक्तेश्वर मुंगशेट्टीवार, शाम पाडेकर, सूर्यभान साळुंखे, नाशिक सायक्लिस्टसचे श्रीकांत जोशी, योगेश शिंदे, वैभव शेटे, चंद्रकांत नाईक, देवींदर भेला, डॉ. नितीन रौंदळ, रवींद्र दुसाने, स्नेहल देव, सोफिया कपाडिया, नीता नारंग, डॉ. मनीषा रौंदळ, पल्लवी पवार तसेच नाशिक सायक्लिस्टसचे सदस्य या सर्व दिव्यांग सायक्लिस्टचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने रॅली मध्ये सहभागी झाले होते.
तसेच सामान्य व्यक्तींबरोबर स्नेहबंध जोपासण्यासाठी हेल्मेट वापरा, वाहन चालवताना मोबाईल वर बोलु नका, पर्यावरणाचे रक्षण करा, वाहतुकीचे नियम पाळा या विषयांवर जनजागृती करण्यात आली.