पुणे: डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटसयांच्या तर्फे आयोजित पहिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत भारती फुलमाळीच्या नाबाद 62धावांच्या खेळीच्या जोरावर डिव्हाईन स्टार्स संघाने शेलार ग्रुप संघाचा 9 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत पहिल्यांदा खेळताना शेलार ग्रुप संघाने 20षटकात 8बाद 109धावा केल्या. यात सोनिया डबीर 32, कोमल झंझाद 14, वैष्णवी काळे 16, चार्मी गवई 13यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत शेलार ग्रुप संघाला 109अशी धावसंख्या उभारून दिली.
डिव्हाईन स्टार्सकडून निकिता भोर(2-11), प्रिया सिंग(2-19), श्रावणी कदम (2-28)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाच्या विजयाचा पाया रचला. डिव्हाईन स्टार्स संघाने18.2षटकात 1गड्यांच्या बदल्यात 111धावा करून पूर्ण केले.
यात भारती फुलमाळीने 45 चेंडूत 7चौकारांसह नाबाद 62धावा, आदिती गायकवाडने 58 चेंडूत नाबाद5चौकारांसह 44धावा केल्या. भारती व आदिती यांनी दुसऱ्या गड्यासाठी 80चेंडूत 111धावांची भागीदारी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सामन्याची मानकरी भारती फुलमाळी ठरली.
3ऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत किरण नवगिरेच्या(58धावा)धडाकेबाज खेळीच्या जोरावर रिग्रीन संघाने मेटा स्कुलचा 7 गडी राखून पराभव करत तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 31000रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 21000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी भारतीय महिला संघाच्या कर्णधार नीलिमा जोगळेकर, माजी भारतीय(फिजीकली चॅलेंज)संघाचे कर्णधार सौरभ रावलीया, डिव्हाईन स्टार्सचे राजेंद्र आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शेलार ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज्चे विश्वनाथ शेलार, रिग्रीनचे सागर राऊत, प्रदीप पाटील अँड असोसिएट्सचे प्रदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: शेलार ग्रुप: 20षटकात 8बाद 109धावा(सोनिया डबीर 32(38,2×4,1×6), कोमल झंझाद 14(9,2×4), वैष्णवी काळे 16(21,3×4), चार्मी गवई 13(24), निकिता भोर 2-11, प्रिया सिंग 2-19, श्रावणी कदम 2-28)पराभूत वि.डिव्हाईन स्टार्स: 18.2षटकात 1बाद 111धावा(भारती फुलमाळी नाबाद 62(45, 7×4), आदिती गायकवाड नाबाद 44(58, 5×4), श्वेतल खटाळ 1-22);सामनावीर-भारती फुलमाळी;
3ऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी लढत:मेटा स्कुल: 15षटकात 8बाद 98धावा(पूनम खेमनार 40(29,4×4), सोनाली शिंदे 25(41,1×4), रोहिणी मोरे 14(10,2×4), उत्कर्षा देशपांडे 1-15, श्रद्धा पाखरकर 1-20)पराभूत वि.11.4षटकात 3बाद 101धावा(किरण नवगिरे 52(28, 7×4, 2×6), तेजल हसबनीस 27(31,2×4), भक्ती शास्त्री 12(9,2×4), पूनम खेमनार 2-20, सोनाली शिंदे 1-19); सामनावीर-किरण नवगिरे.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: किरण नवगिरे(170धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: निकिता भोर(10विकेट)
मालिकावीर: सोनिया डबीर(235धावा व 2विकेट)
उद्योमुख खेळाडू: आदिती जोशी
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: चार्मी गवई
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: आदिती गायकवाड