---Advertisement---

भर सामन्यात अव्वल मानांकित जोकोविचचे पुन्हा एकदा सुटले रागावरील नियंत्रण आणि…

On: रविवार, सप्टेंबर 20, 2020 12:59 PM
---Advertisement---

मुंबई । शनिवारी इटालियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत नोवाक जोकोविच आणि जर्मनीचा डॉमिनिक कोफर आमने सामने होते. या सामन्यात सर्बियन स्टार नोवाक जोकोविचचे रागावरील नियंत्रण सुटलेले पहायला मिळाले.

या सामन्यात जोकोविचने कोफरवर 6-3, 4-6, 6-3 ने विजय मिळवला. पण दुसर्‍या सेट दरम्यान त्याने रागाने आपली रॅकेट जमिनीवर आदळली, ज्यामुळे त्याच्या रॅकेटची चौकट मोडली आणि त्याला एक नवीन रॅकेट घ्यावी लागला. त्याला मैदानातील पंचांकडूनही इशारा मिळाला.

सामन्यादरम्यान जेव्हा पंचानी त्याच्याविरूद्ध निर्णय घेतला आणि एका गुणासाठी पुन्हा खेळण्याचा आदेश दिला, तेव्हा जोकोविच पंचांकडे रागाने पहात होता. दोन आठवड्यांपूर्वी नकळत झालेल्या चुकीमुळे नोवाक जोकोविच अमेरिकन ओपन स्पर्धेमधून बाहेर पडला होता. अमेरिकन ओपनमधून बाहेर पडल्यानंतर त्याने मोठा धडा घेतला असल्याचे सांगितले होते.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---