---Advertisement---

अंतिम सामन्यात बॅकफूटवर पडलेल्या जोकोविचच्या संयमाचा सुटला बांध, केली ‘नकोशी कृती’- VIDEO

On: सोमवार, सप्टेंबर 13, 2021 2:35 PM
---Advertisement---

यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात सर्बियाचा नोवाक जोकोविच याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याला अंतिम सामन्यात रूसच्या दानिल मेदवेदेव याने हरवले आहे. चाहत्यांच्या त्याच्याकडून अंतिम सामना जिंकण्यासाठी फार अपेक्षा होत्या. अंतिम सामन्यात तो विजयी ठरला असता, तर त्याच्या नावावर एक मोठा जागतिक विक्रम नोंदवला गेला असता.

अंतिम सामन्यात दानिल मेदवेदेव तिन्ही सेटमध्ये जोकोविचच्या पुढे होता. सामन्याच्या सुरुवातीपासून मेदवेदेवने जोकोविचवर वर्चस्व निर्माण केले होते आणि जोकोविच दबावाखाली खेळत असल्यासारखे वाटत होते. सामन्यात सुरुवातीपासूनच मागे असल्यामुळे जोकोविचचा स्वत:वरचा संयम सुटलेला पाहायला मिळाला. दरम्यान, सामना सुरू होऊन जवळपास दिड तास झाला होता आणि जोकोविच अजूनही मेदवेदेवच्या मागेच होता. तो पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत होता. पण मेदवेदेव त्याच्या प्रत्येक प्रयत्नाला अपयशी ठरवत होता.

त्यानंतर त्याचा संयम सुटला आणि त्याने सामन्यादरम्यान त्याचे रॅकेट कोर्टवर आदळलेले पाहायला मिळाले. त्याने असे तीन वेळा केले आणि रॅकेट टोडले. यानंतर त्याला चेतावणी देण्यात आली होती.

https://twitter.com/hemjhaveri/status/1437166682456395779?s=20

अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर जोकोविचच्या डोळ्यात पाणी आले होते. डोळ्यात पाणी असतानाही तो मेदवेदेवच्या खेळीचे कौतुक करत होता. सामन्यात जेव्हा तिसऱ्या सेटमधील ९ वा गेम खेळला जात होता, तेव्हाच जोकोविचने रडायला सुरुवात केली होती. त्याने टाॅवेलने डोके झाकले होते आणि त्याचे खांदे थर-थर कापत होते. तिसऱ्या सेटमधील एक गेम शिल्लक होता, पण ते सामना जिंकू शकत नव्हता. त्याला रडताना पाहून प्रेक्षकही भावूक झाले होते.

२१ ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू बनला असता जोकोविच
त्याने हा अंतिम सामना जिंकला असता तर तो एकमेव टेनिस खेळाडू बनला असता, ज्याने त्याच्या कारकिर्दीत २१ ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. सध्या स्पेनचा राफेल नडाल, स्विट्जरलँडचा रोजर फेडरर आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच हे तिघे २० ग्रँड स्लॅमसह बरोबरीवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

जोकोविचच्या ‘कॅलेंडर ग्रँडस्लॅम’ जिंकण्याचा स्वप्नाचा चुराडा, सुरेख प्रदर्शनासह मेदवेदेव ठरला विजेता

जोकोविचला ‘कॅलेंडर ग्रँडस्लॅम’ जिंकण्याची संधी, पण नक्की हे आहे तरी काय? घ्या जाणून

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी एमाचे घवघवीत यश, यूएस ओपनचे जेतेपद पटकावत रचला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---