सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचला सध्या सुरु असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्याने लाईन अंपायरला बॉल मारल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तो या स्पर्धेतील अव्वल मानांकित टेनिसपटू होता. ही घटना रविवारी अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीत घडली.
चौथ्या फेरीत जोकोविचचा सामना स्पेनच्या पाब्लो कार्रेनो बुस्टाविरुद्ध सुरु होता. त्यावेळी पहिल्या सेटमध्ये जोकोविच ५-६ असा पिछाडीवर असताना त्याने खिशातील बॉल काढून लाईन अंपायरच्या दिशेने मारला. तो बॉल लाईन अंपायर असलेल्या महिलेच्या गळ्याला लागला. या घटनेनंतर जोकोविच लगेचच तिची चौकशी करण्यासाठी तिच्याजवळ गेला होता. काहीवेळानंतर ती उठून कोर्टबाहेर गेली.
यानंतर मात्र बराचवेळ जोकोविच स्पर्धेचे रेफ्री सोरन फ्रेंमेल आणि ग्रँड स्लॅम पर्यवेक्षकांबरोबर चर्चा करताना दिसला. पण अखेर त्याला अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय मान्य करावा लागला आणि तो बुस्टाबरोबर आणि चेअर अंपायरबरोबर हात मिळवून कोर्टबाहेर गेला.
जोकोविचच्या बाहेर जाण्याने आता अमेरिकन ओपनला यावेळी नवा विजेता मिळेल. कारण यावेळी रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दोन्ही टेनिसपटूंनी या स्पर्धेतून माघार घेतली होती.
जोकोविचवर या घटनेबद्दल कारवाई करण्यात आली आहे. त्याला या स्पर्धेतून मिळालेले सर्व रँकिंग पॉइंट्स गमवावे लागले आहेत. याबरोबरच त्याला या स्पर्धेत जिंकलेली सर्व बक्षीस रक्कमही आता मिळणार नाही. त्याला २ लाख ५० हजार डॉलरचा दंड झाला आहे.
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत यावेळी पुरुष व महिला प्रत्येकी विजेत्यांना ३० लाख डॉलर अर्थात आजच्या रेटप्रमाणे तब्बल २२ कोटी मिळणार आहे. तर उपविजेत्याला ११ कोटी, सेमीफायनलमधून बाहेर पडणाऱ्या खेळाडूला ६ कोटी व उपांत्यफेरीत ३ कोटी रुपये मिळतात. यावेळी स्पर्धेत राफेल नदाल व रॉजर फेडररसारखे दिग्गज खेळत नव्हते. तसेच सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला जोकोविचला या स्पर्धेचे प्रबळ दावेदार समजले जात होते. अशा वेळी त्याने रागाने मारलेला शॉट त्याला किती महागात पडला याचा अंदाज येतो.
महत्त्वाच्या बातम्या –
खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यानंतर हा मोठा सामना झाला रद्द
टीम इंडियात हक्काची जागा न मिळालेला विदर्भाचा धडाकेबाज ढाण्या वाघ
ट्रेंडिंग लेख –
भारतीय संघाकडून वनडेत खेळलेले ४ खेळाडू, जे फारसे कुणाला माहीत नाही
टीम इंडियात हक्काची जागा न मिळालेला विदर्भाचा धडाकेबाज ढाण्या वाघ
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० धावांचा टप्पा ओलांडणारे ५ क्रिकेटर्स; या भारतीयांचा आहे समावेश