आज बुधवार, २१ मार्चला सायं.ठिक ७:३०वा. आपल्या भेटीला पिंपरी चिंचवडमध्ये येत आहेत गांधीजीचे “विश्व मैत्री” चा संदेश जगभरात पासरविणारे श्री ज्ञानेश्वर येवतकर.
ज्ञानेश्वर येवतकर (वय२६) हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील,दि:-२०सप्टें.२०१६ पासून ते सायकलवर जगभ्रमंती करत आहेत.आत्तापर्यंत त्यांनी १३ देश,२०+हजार किमी,४२०+दिवस प्रवास केला आहे. त्यांची ही सायकल यात्रा एकूण ७५ देश,७५ हजार किमी,१०९५ दिवस असणार आहे.
या यात्रेची सांगता(शेवट) २ऑक्टो.२०१९ ला पाकिस्तानमध्ये गांधीजीच्या १५० व्या जयंतीला होणार आहे. हा तरुण आपल्या गांधीजींचा अहिंसा, प्रेम व शांतीचा संदेश जगभर पसरावे म्हणून प्रयत्न करत आहे. ही सायकल यात्रा सर्व लोक सहभागातून होत आहे.
फार वर्षा पूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या पसायदानात म्हंटले आहे की हे विश्व ची माझे घर,याच सिद्धांताचा वापर या कलीयुगात ज्ञानेश्वर येवतकर करत आहेत. त्यांनी या ४२०+ दिवसात पाहिलेले अनुभव आपल्या समोर मांडणार आहेत.
यावेळी वाघासोबत झालेली दोस्ती, भय व टायफून सारख्या महाकाय समुद्री तुफानात झालेली दशा, उपासमार सहन करून केलेला प्रवास अशा अनंत अडचणी व वेळोवेळी अनेक ज्ञात-अज्ञातांनी दिलेला मदतीचा हात, अंगावर शहारे आणणाऱ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत.
स्थळ:-
सायकमित्र– अभिजीत कुपटे यांचे “सायकल-रिपब्लीक”शॉप नं.५ पुजा गार्डन अपार्टमेंट,आकुर्डी पोलीस चौकीचे मागे,प्राधिकरण जलतरण तलावासमोर
वेळ:- सायंकाळी ७:३०वा.
अभिजीत कुपटे- 9923005485
चला भेटूया सायकलवर जगभ्रमंती करणाऱ्या एका अवलीयाला….
आज सायं.ठिक ७:३०वा. आपल्या भेटीला येत आहेत ज्ञानेश्वर येवतकर ते ७५ देश,७५ हजार किमी, १०९५ दिवस सायकलवर जगभ्रमंतीला निघाले आहेत.
स्थळ: सायकल-रिपब्लीक, आकुर्डी पोलीस चौकीचे मागे, प्राधिकरण जलतरण तलावासमोर, वेळ:सायंकाळी ७:३०वा pic.twitter.com/aC7I7TPMLL— CycleRepublik (@CycleRepublik) March 21, 2018