भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री त्यांच्या नवीन पुस्तकामुळे सध्या चर्चेत आहेत. ‘स्टारगेझिंग : प्लेयर्स इन माय लाइफ’ असं या पुस्तकाचं नाव असून अनेक मजेदार घटनांची तपशीलवार माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
शास्त्रींचा जावेद मियांदाद यांच्यामागे बूट घालून धावण्याचा किस्सा बऱ्याच जणांना माहित आहे. आता त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खानबद्दलही पुस्तकात थोडी माहिती दिली आहे. तसेच या पुस्तकात इम्रान खान यांचे कौतुक केले आहे. क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी ते एक आहेत. त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्या नावावर नोंदवलेले आकडे आणि विक्रम सांगतात की, त्यांचे कर्तृत्व किती मोठे होते, अशा शब्दांमध्ये शास्त्रींनी इम्रान खान यांचे कौतुक केले आहे.
शास्त्री पुढे म्हणाले की, ‘जर इम्रान खानच्या क्षमतेवर कोणी शंका घेत असेल. तर तो व्यक्ती त्याच्यासोबत आणि त्याच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंशी तुम्ही बोलू शकता. जेव्हा तो त्याच्या अनुभवाशी संबंधित किस्से सांगेल, तेव्हा तुम्हाला इम्रानची महानता लक्षात येईल.’
पाकिस्तानच्या या दिग्गज खेळाडूला ते पहिल्यांदा कसे भेटले? याबद्दल शास्त्री लिहितात, जेव्हा ते १९८७ मध्ये भारताच्या २५ वर्षांखालील संघाचे कर्णधार बनले आणि पाकिस्तानला गेले होते. तेव्हा ते इम्रान खानला पहिल्यांदा भेटले होते. त्या सामन्यात इम्रान खान मैदानावर उशिरा पोहोचला होता.
इम्रानला मैदानावर पोहोचल्यानंतर लगेचच गोलंदाजी करायची होती. पण रवी शास्त्रींनी पंचांना नियमांनुसार पुढे जाण्यास सांगितले आणि इम्रानला गोलंदाजी करण्यापासून रोखले. यामुळे इम्राननी वसीम अक्रमला आरडाओरडा केला आणि बाउन्सर मारून रवी शास्त्रीचे डोके फोडण्यास सांगितले होते.
याबद्दल शास्त्री पुढे लिहितात, ‘१९८७ मध्ये, जेव्हा मी भारताच्या २५ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करताना पाकिस्तानला पोहोचलो, तेव्हा इम्रान खान उशिरा स्टेडियमवर पोहोचले. त्यांनी ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे सांगत माफी मागितली. ते ठीक होते. पण मैदानावर पोहोचताच त्यांना गोलंदाजी सुरू करायची होती, ज्यासाठी मी तयार नव्हतो. हे नियमांच्या विरोधात होत असल्याचे पाहून, मी पंचांना नियमांचे पालन करण्यास सांगितले. याचा राग येऊन इम्रान खानने वसीम अक्रम आणि उर्वरित गोलंदाजांना सांगितले की, एकतर बाउंसर्सने माझे डोके फोडा किंवा मला घाबरवा.’
अशा अनेक किस्यांनी रवी शास्रींचे पुस्तक भरलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्ध केलेल्या शानदार कामगिरीमागचे ‘हे’ आहे रहस्य, ओली पोपनेच केलाय खुलासा