क्रिकेटच्या मैदानात खेळताना प्रतिस्पर्ध्यांतील संघर्ष नेहमीच आपण पाहतो. जिंकण्याच्या ईर्षेने दोन्ही संघ हा संघर्ष करतात. त्याचवेळी काही खेळाडू साम-दाम-दंड-भेद या नीतीचा अवलंब करत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. अशावेळी एखाद दुसरा खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर देखील जातो. खुन्नस देतो. मात्र, मॅच संपल्यावर हेच खेळाडू एकमेकांशी हातमिळवणी करताना दिसतात. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडतो की? ग्राउंडवर एकमेकाशी भिडायला तयार झालेले क्रिकेटर्स, मॅचनंतर फक्त औपचारिकता म्हणून शेक हॅन्ड करतात की, ग्राउंडबाहेरही त्यांची अशीच मैत्री असते?. तर याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
ग्राउंडवर टशनमध्ये असणारे हे क्रिकेटर्स पुढे मैत्री टिकवतात का? या प्रश्नाचे उत्तर आहे, हो. ग्राउंडवर जिंकण्यासाठी जीवाचे रान करणारे हे क्रिकेटर आपल्या आयुष्यात मात्र या प्रतिस्पर्ध्यांना अत्यंत मानाचे स्थान देतात. त्यांच्याशी मैत्री टिकवून ठेवतात. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. क्रिकेट इतिहासातील अशाच काही उदाहरणांवरून आपण समजून घेऊ की, दोन देशातील या क्रिकेटर्सचा याराना किती असतो?.
भारत आणि पाकिस्तान नाव घेतलं तरी, अनेक जणांना क्रिकेटच्या ग्राउंडवर घडणाऱ्या महायुद्धाची कल्पना येईल. या दोन्ही देशातील क्रिकेट मॅच असते तेव्हा पारा चढतोच. त्यानच जणूकाही क्रिकेटर्सना एनर्जी येते. प्लेअर्स जिद्दीला पेटतात. अशावेळी खुन्नस टॉपला जाते. त्यातही वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यासारखे क्रिकेटर्स म्हटल्यावर ग्राउंडमध्ये फॅन्सचे इंटरटेनमेंट होणारच. सेहवागने अख्तरला बाप बाप होता है, म्हणत दाखवलेला हिसका आणि हरभजनने आशिया कपपासून ड्रेसिंग रूमपर्यंत त्याच्याशी घेतलेला पंगा, हे सारं ऐकूनच भारतीय फॅन्सला स्फुरण चढते. एवढेच काय कॉमेंट्री करतानाही त्यांच्यात खटके उडत असतात. मात्र, असे असले तरी त्यांच्यातील मैत्रीच एक खास नात आहे. त्यांच्यातील टाँग खिचाई नेहमीच सुरू असते. अख्तरच्या आईच्या निधनानंतर सर्वप्रथम सांत्वना देणारे हरभजन-वीरूच होते.
ऑस्ट्रेलियाचा दिवंगत लिजेंड्री लेगस्पिनर शेन वॉर्न हा खरंतर यारो का यार होता. प्रत्येक देशाच्या क्रिकेटरसोबत त्याचे नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध राहिले. पण भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्याशी त्याचे काही खासच जमायचे. दोघे आपापल्या प्रकारातील अव्वल. त्यामुळे त्यांचा सामनाही तितकाच जबरदस्त व्हायचा. कधी सचिन तर कधी वॉर्न वरचढ ठरायचा. वॉर्न तर इथपर्यंत बोलला होता की, सचिन त्याच्या स्वप्नात येतो. मात्र ग्राउंडबाहेर त्यांची ही रायवलरी एकदम दोस्तीत बदलत. सचिन ऑस्ट्रेलियाला गेला की वॉर्नच्या घरी हमखास जायचा. तर वॉर्न मुंबईत आल्यावर सचिनच्या घरी गेला नाही असे कधी होऊ शकत नाही.
युवराज सिंग आणि केविन पीटरसन दोघेही आपापल्या देशाचे लिजेंड. दोघांचा स्वभावही तसाच फ्लॅमबॉयंट. ग्राउंडवर तर दोघांमध्ये ३६ चा आकडा. दोघे एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी सोडत नसायचे. त्यांचे ग्राउंडवर अजिबात पटत नसेल. मात्र, ग्राउंडच्या बाहेर त्यांच्यातील संबंध नेहमीच मित्रत्वाचे राहिले. युवराजने म्हटलेले आम्ही देशासाठी खेळताना मैत्री बाजूला ठेवतो. मात्र, बाहेर तो माझा बेस्टी आहे. तर पीटरसन युवराजचे जगातील सर्वात टॅलेंटेड क्रिकेटर म्हणून कौतुक करतो.
हे झाली मॉडर्न क्रिकेटर्सची दोस्ती. मात्र याआधी देखील अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी दोस्तीची नवी मिसाल पेश केलेली. यामध्ये आघाडीवर होते भारताचे सुनील गावसकर आणि पाकिस्तानचे इम्रान खान. दोघांनी आपआपल्या देशाची भरपूर सेवा केली. ग्राउंडवर एकमेकांशी भिडले ग्राऊंडच्या बाहेर त्यांची मैत्री चिरकाल कायम राहिली. अजूनही दोघे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतात. गावसकर कॉमेंट्री करताना नेहमी इम्रान खान यांची आठवण काढत असतात.
वर्ल्ड क्रिकेटमधील दोन अल्टिमेट लिजेंड म्हणजे सर विवियन रिचर्ड्स आणि सर इयान बॉथम. रिचर्ड्स वेस्ट इंडीजचे तर बॉथम इंग्लिश. सॉमरसेटसाठी खेळताना त्यांची मैत्री झाली जी अजूनही कायम आहे. रिचर्ड्स यांच्या एकसष्टी निमित्ताने बॉथम ऍटिग्वापर्यंत पोहोचले तेव्हा मी दाखवून दिले की, ही मैत्री किती घट्ट आहे. बॉथम नेहमी म्हणतात आमच्यात मैत्री नाहीच, आम्ही दोघे भाऊ-भाऊ आहोत.
महत्त्वाच्या बातम्या-
एकहजारी मनसबदार बनला कर्णधार रोहित, विराटचा विक्रम मोडला; पण आझमपासून मागे राहिला
स्टार टेनिसपटू राफेल नदालची विम्बल्डनमधून माघार, जाणून घ्या का घेतला मोठा निर्णय
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन ‘त्यांनी’ गांगुलीला रडवले