भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा आणि महत्वाचा टी२० सामना आज शुक्रवारी (दि.१७ जून) राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. एकूण पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील हा चौथा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. याचे कारण ५ सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ अगोदरच २-१ असा आघाडीवर आहे.
सुरुवातीलाच मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेने मालिकेवर पकड मजबूत केली. परंतू, तिसरा सामना जिंकत भारताने मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. मात्र, शुक्रवारचा सामना न जिंकल्यास भारत मालिका गमावू शकतो. त्यामुळे मालिकेतील आव्हान टिकवू ठेवण्यासाठी भारतीय संघाला आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे.
टीम इंडियाचा संभाव्य संघ :
रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल
दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ :
टेम्बा बावुमा (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), क्विंटन डी कॉक/रीझा हेंड्रिक्स , रॅसी वान डर दुसेन, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिके नॉर्खिया, तबरेज शम्सी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारत की दक्षिण आफ्रिका, आज कोणाच नाणं खणकणार? पाहा काय सांगते सामन्याची खेळपट्टी
भारत मालिका गमावणार? दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू चौथ्या टी२०मध्ये करू शकतो दमदार पुनरागमन
‘कर्णधार’ हार्दिक मैदानात उतरताच ६३ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची होणार पुनरावृत्ती, असेल पाचवा संघनायक