इंग्लिश अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर लवकरच एक माहितीपट प्रदर्शित होणार आहे. ३१ वर्षीय स्टार ऑलराऊंडरच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित या माहितीपटाचा ट्रेलर प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. या स्टार खेळाडूच्या कारकिर्दीपासून ते त्याच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंतची माहिती ट्रेलरमध्ये सांगण्यात आली आहे. या चित्रपटाबद्दल स्टोक्सचे म्हणणे आहे की, “मला एक गोष्ट करून पहायची आहे आणि ती म्हणजे आपण टीव्हीवर जे पाहतो त्यापासून दूर असलेली दुसरी प्रतिमा आहे.”
Official Trailer: 𝐁𝐞𝐧 𝐒𝐭𝐨𝐤𝐞𝐬: 𝐏𝐡𝐨𝐞𝐧𝐢𝐱 𝐟𝐫𝐨𝐦 𝐭𝐡𝐞 𝐀𝐬𝐡𝐞𝐬
Coming to Prime Video on 26 August 🏏📺 pic.twitter.com/Pbysscty3O
— Amazon Prime Video Sport (@primevideosport) July 28, 2022
स्टोक्सने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. निवृत्तीची घोषणा करताना त्याने स्पष्टपणे सांगितले की, आता माझे शरीर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळू देत नाही. तो पुढे म्हणाला की, “आमच्याकडून काय अपेक्षित आहे, परंतु मला असेही वाटते की मी दुसर्या खेळाडूची जागा घेत आहे, जो जोस बटलर आणि उर्वरित संघाला आपले सर्व काही देऊ शकेल. क्रिकेटपटू म्हणून प्रगती करण्याची आणि गेल्या 11 वर्षांतील अविश्वसनीय आठवणी निर्माण करण्याची हीच वेळ आहे.
दरम्यान, स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक क्रिकेट दिग्गजांकडून आयसीसीच्या व्यस्त वेळापत्रकावर टिकी-टिपण्णी करण्यात आली. यामध्ये अनेकांनी खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दबाव वाढत असल्याचे सांगितले होते. मात्र, असे असले तरी कोणत्या खेळाडूंनी कोणता क्रिकेट प्रकार खेळावा याचा निर्णय सर्वस्वी खेळाडू आणि देशाचा क्रिकेट बोर्ड घेत असल्याचेही अनेक दिग्गजांनी सांगितले. त्यामुळे आता स्टोक्सच्या निवृत्तीनंतर अनेक वादप्रसंग निर्माण झाले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
WIvIND: टी२० मालिकेसाठी कॅरेबियन संघाची घोषणा; आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंचे कमबॅक
वेगाचा बादशहा थांबणार! फॉर्मुला वन चॅम्पियन वेटेलची निवृत्तीची घोषणा; भारताशी होते खास नाते
‘लॉर्ड’ शार्दुल विसरतोय त्याची भारतीय संघातील भूमिका, माजी निवडकर्त्याने करून दिलीय आठवण