---Advertisement---

महत्त्वाच्या संघाची घोषणा! अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, तर सूर्याही ताफ्यात सामील

On: मंगळवार, डिसेंबर 6, 2022 2:30 PM
Suryakumar-Yadav-POTM
---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. आगामी रणजी ट्रॉफी हंगामासाठी मुंबईने त्यांच्या संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या खांद्यावर मुंबई संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयसवाल यांसारख्या युवा खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे. सूर्यकुमार यादव याला देखील ताफ्यात सामाली करण्यात आले आहे, परंतु तो दुसऱ्या सामन्यापासून संघात उपलब्ध असणार आहे.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याबद्दल बोलायचं झालं, तर तो भारतीय संघासाठी तुफान कामगिरी करत आहे. टी20 विश्वचषक 2022मध्ये सर्वाधिक धावा करणारा सूर्यकुमार तिसरा फलंदाज बनला होता. त्याने यादरम्यान अनेक शानदार खेळी साकारल्या होत्या. सूर्यकुमार टी20 विश्वचषकानंतर न्यूझीलंड दौऱ्यावरही भारतीय संघाचा भाग होता. मात्र, बांगलादेश दौऱ्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. अशात सूर्यकुमार यादव याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

सूर्यकुमार यादवच्या येण्याने मुंबई संघाला मिळणार मजबूती
मुंबई संघाबद्दल बोलायचं झालं, तर या संघात अनेक दिग्गज खेळाडूंना सामील करण्यात आले आहे. यात पृथ्वी शॉ, यशस्वी जयसवाल, अरमान जाफर, सरफराज खान आणि तुषार देशपांडे यांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवच्या खेळल्याने संघ आणखी मजबूत होईल.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळून सूर्यकुमार यादव त्याच्या खेळीत आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. तो भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचा विचारातही असेल, आणि रणजी ट्रॉफीत धावा करून तो आपली दावेदारी ठोकू शकतो. आता तो या हंगामात कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रणजी ट्रॉफीसाठी मुंबईचा संपूर्ण संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुशीर खान, मोहित अवस्थी, पृथ्वी शॉ, यशस्वी जयसवाल, अरमान जाफर, सरफराज खान, सिद्धार्थ राऊत, सुवेद पारकर, हार्दिक तामोर, प्रसाद पवार, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, रॉयस्तान डायस, सूर्यांश शेडगे, शशांक अतरदे. (Domestic cricket mumbai announced ranji trophy squad)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जबाबदारी वाढल्याने जयवर्धनेने सोडले चॅम्पियन संघाचे प्रशिक्षकपद; आता दिसणार या भूमिकेत

6 डिसेंबरचा जन्म असलेल्या 11 तगड्या क्रिकेटपटूंची ‌‌’बर्थडे इलेव्हन’! सहा भारतीयांचा समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---