---Advertisement---

सीएसकेच्या ताफ्यात रोहित शर्माच्या भिडूची एन्ट्री, घेणार दुखापग्रस्त सॅमची जागा; वाचा त्याच्याबद्दल

On: गुरूवार, ऑक्टोबर 7, 2021 9:19 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषक जवळ येऊन ठेपला असताना बरेच खेळाडू जखमी होताना दिसत आहेत. भारतीय संघासोबतच इतर संघांना याचा फटका बसला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा इंग्लडचा वेगवान गोलंदाज सॅम करनही जखमी झाला होता. सीएसकेने त्याच्या जागी आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी डॉमिनिक ड्रॅक्सचा आपल्या संघात सामील केले आहे. डॉमिनिक ड्रॅक्स डाव्या हाताने मध्यम वेगाने गोलंदाजी करतो.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन आयपीएल २०२१ मधून बाहेर झाला आहे. पाठीच्या दुखण्याच्या तक्रारीनंतर सॅम करनच्या पाठीचा स्कॅन करण्यात आला, ज्यामध्ये दुखापतीची पुष्टी झाली होती. सॅम करनला आयपीएलसह टी२० विश्वचषक २०२१ मधून वगळण्यात आले आहे. यावरून त्याच्या दुखापतीचे गांभीर्य समजले जाऊ शकते.

सॅमच्या जागी संधी दिला गेलेला वेस्ट इंडिजचा खेळाडू डॉमिनिक ड्रॅक्सने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही, तो अनकॅप्ड खेळाडू आहे. त्याला प्रथमच आयपीएल २०२१ च्या संघात समाविष्ट करण्यात आले आहे. तो सध्या आयपीएलच्या बायो बबलचा भाग आहे. तो रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघाचा नेट बॉलर होता.

२४ वर्षीय डॉमिनिक ड्रॅक्स, सीपीएलमध्ये बार्बाडोस ट्रायडेंट्स आणि सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स या संघांचा सदस्य राहिला आहे. डॉमिनिकच्या टी-२० कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १९ सामन्यात २० गडी बाद केले आहेत. डॉमिनिकने १९ टी-२० सामन्यांमध्ये ८.९७ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.

तत्पूर्वी, गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागते होते. सीएसकेने दिल्ली कॅपिटल्ससमोर १३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सीएसके गोलंदाजांनी सर्वोत्तम प्रयत्न केले. पण दिल्लीला विजयापासून रोखू शकले नाहीत. यासह, दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल २०२१ गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर सीएसके संघ दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहलीचा आरसीबी संघ तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानी केकेआरचा संघ बाजी मारतो की, मुंबईचा संघ हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

अवघ्या दुसऱ्या सामन्यात ‘काश्मिरी बॉय’ने रचला इतिहास, बनला आयपीएल २०२१चा ‘नवा स्पीडस्टार’

वयाची तिशी ओलांडल्यानंतरही हर्षलचा दरारा कायम! ‘या’ बड्या विक्रमात चेन्नई, मुंबईकरांवरही ठरलाय सरस

रोहितमध्ये घुसला ‘ऍक्टिंगचा किडा’, बड्या क्रिकेटरची केली हुबेहुब नक्कल; व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---