---Advertisement---

‘आमच्या अंतर्गत प्रश्नात लुडबुड नको’, शेतकरी आंदोलनात नाक खुपसणाऱ्या रिहानाला भारतीय क्रिकेटपटूने फटकारले

---Advertisement---

भारताच्या राजधानीत गेले २ महिने शेतकरी अंदोलन सुरु आहे. या अंदोलनाला आता हिंसक वळणही मिळाले आहे. त्यामुळे या अंदोलनाबाबत अनेक सेलिब्रेटींनीही आपली मते मांडली आहे. त्यातच नुकतेच हरियाणातील अनेक जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे देखील विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता याबाबत जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हीने देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, त्यावर प्रज्ञान ओझाने तिला फटकारले आहे.

रिहानाने सीएनएनचे इंटरनेट सेवा बंद केल्याचे दिलेले वृत्त ट्विट करताना लिहिले आहे की ‘आपण याविषयी का विचार करत नाही.’ याबरोबरच तिने या ट्विटमध्ये #FarmersProtest असा हॅशटॅगही वापरला आहे. तिच्या या ट्विटवर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तिला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी तिला हा भारताचा प्रश्न आहे, त्यात पडू नको, असे म्हटले आहे.

प्रज्ञान ओझाने रिहानाला फटकारले –

भारताचा माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने देखील तिच्या ट्विटवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की ‘माझ्या देशाला देशातील शेतकऱ्यांचा अभिमान आहे आणि ते किती महत्वाचे आहेत हेही माहित आहे. मला विश्वास आहे, ही हे प्रकरण लवकरच मार्गी लागेल. आम्हाला आमच्या अंतर्गत प्रकरणांत कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपाची गरज नाही.’

पानेसरचे रिहानाला मुलाखतीसाठी आमंत्रण 

प्रज्ञान ओझा व्यतिरिक्त इंग्लंडचा क्रिकेटपटू मॉन्टी पानेसरने देखील रिहानाच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली असून त्याने या विषयावर मुलाखतीसाठीही तिला आमंत्रित केले आहे. त्याने म्हटले आहे की ‘माझ्या @panjabradio_ @AsianFXRadio वरील ‘द फुल मॉन्टी’ (The Full Monty) या कार्यक्रमात शनिवारी भारतातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुलाखत घेण्यात आनंद होईल.’

ग्रेटा थनबर्गचेही ट्विट –

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही भारतातील शेतकरी अंदोलनाबाबत ट्विट केले आहे. तिने तिच्या ट्विटमध्ये भारतातील शेतकऱ्यांचं समर्थन करत त्यांना पाठिंबा दिला आहे.

 

बुधवारी(३ फेब्रुवारी) संसदेत शेतकरी अंदोलन आणि कृषी कायद्यावर चर्चा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या २ कसोटीतून विश्रांती घेतल्याबद्दल टी नटराजनने दिली महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाला…

“भारतीय संघ विजयाचा १०० दक्के दावेदार आहे,” इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाचे भाष्य

जयदेव उनाडकट चढला बोहल्यावर; गुपचूप उरकला विवाहसोहळा, पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---