पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-केपीआयटी लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत श्रावणी देशमुख व अव्दिक नाटेकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दुहेरी मुकुट संपादन केला.
दिलीप वेडेपाटील स्पोर्ट्स अकादमी, बावधन येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकीत श्रावणी देशमुखचा आठव्या मानांकीत साहना कमलाकन्ना हीचा 4-0, 4-1 असा तर मुलांच्या गटात अव्वल मानांकीत अव्दिक नाटेकरने शिवतेज श्रीफुलेचा 4-0, 4-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
14 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकीत श्रावणी देशमुखने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत अव्वल मानांकीत क्षिरीन वाकलकरचा 4-0, 4-2 असा पराभव करत दुहेरी मुकुट पटकावला. मुलांच्या गटातही चौथ्या मानांकीत अव्दिक नाटेकरने दुस-या मानांकीत अदनान लोखंडवालाचा 5-4(7), 4-2 असा टायब्रेकमध्ये पराभव करत दुहेरी मुकुट पटकावला.
स्पर्धेतील विजत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषीके देण्यात आली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी
12 वर्षाखालील मुली
श्रावणी देशमुख वि.वि साहना कमलाकन्ना (8) 4-0, 4-1
12 वर्षाखालील मुले
अव्दिक नाटेकर(1) वि.वि शिवतेज श्रीफुले 4-0, 4-2
14 वर्षाखालील मुली
श्रावणी देशमुख वि.वि क्षिरीन वाकलकर (1) 4-0, 4-2
14 वर्षाखालील मुले
अव्दिक नाटेकर(4) वि.वि अदनान लोखंडवाला (2) 5-4(7), 4-2