पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत 19वर्षांखालील मुलांच्या गटात आरुप सहा, 17 वर्षांखालील मुलींच्या गटात आशिका शर्मा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी क्लबच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अरुप साहाने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सहाव्या मानांकित नरेन इंदानीचा 11-7, 11-4, 11-6, 11-8 असा पराभव करून आणखी एका सनसनाटी निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित प्रणव घोळकरने आठव्या मानांकित जय पेंडसेचा 12-10, 11-9, 7-11, 8-11, 11-8, 11-9 असा तर, चौथ्या मानांकित आदित्य जोरीने रामानुज जाधवचा 11-2, 11-6, 11-7, 11-7 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. 17 वर्षांखालील मुलींच्या गटात पाचव्या मानांकित आशिका शर्माने चौथ्या मानांकित जान्हवी फणसेवर 10-12, 7-11, 13-11, 11-8, 11-7, 11-9 असा विजय मिळवत आगेकूच केली.अव्वल मानांकित पृथा वर्टीकरने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तनया अभ्यंकरचा 11-3, 11-5, 11-9, 11-3 असा तर, दुसऱ्या मानांकित राधिका सकपाळने सातव्या मानांकित पृथा आचरेकरचा 11-4, 11-8, 7-11, 15-17, 11-7, 11-3 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
15 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रणव घोळकर, शौरेन सोमण, आराध्य पाटील, अर्णव झगडे यांनी तर मुलींच्या गटात रुचिता दारवटकर, सई कुलकर्णी, तनया अभ्यंकर, जान्हवी फणसे यांनी उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
15 वर्षांखालील मुले:
प्रणव घोळकर[1] वि.वि.श्रेयस माणकेश्वर[8] 11-1, 11-5, 11-6;
शौरेन सोमण[5]वि.वि.सुमेध परांजपे 11-3, 11-3, 11-5;
आराध्य पाटील[6]वि.वि.आयुश भट 11-1, 11-6, 11-9;
अर्णव झगडे[2] वि.वि.दर्श भिडे[7] 11-8, 11-7, 11-7;
15 वर्षांखालील मुली:
रुचिता दारवटकर[1] वि.वि.आद्या गावत्रे[8] 11-6, 11-5, 11-5;
सई कुलकर्णी[5] वि.वि.निधी भांडारकर[4] 5-11, 11-8, 11-7, 11-7;
तनया अभ्यंकर[3] वि.वि.पलक जेसवानी[6] 13-11, 11-6, 11-6;
जान्हवी फणसे[2] वि.वि.श्रिया शेलार[7] 11-9, 11-6, 11-5;
17 वर्षांखालील मुले:
प्रणव घोळकर[1] वि.वि.श्रेयस माणकेश्वर[8] 11-6, 11-4, 9-11, 11-3, 11-4;
वेदांग जोशी[4] वि.वि.आर्यन इंगळे 11-8, 11-6, 11-7, 11-7;
रामानुज जाधव[6] वि.वि.शौर्य काळे 3-11, 11-3, 13-11, 11-7, 7-11, 12-10;
प्रणव खेडकर[2] वि.वि.आराध्य पाटील[7] 10-12, 11-7, 11-6, 11-8, 11-9;
17 वर्षांखालील मुली:
पृथा वर्टीकर[1] वि.वि.तनया अभ्यंकर 11-3, 11-5, 11-9, 11-3;
आशिका शर्मा[5] वि.वि.जान्हवी फणसे[4] 10-12, 7-11, 13-11, 11-8, 11-7, 11-9;
राधिका सकपाळ[2] वि.वि.पृथा आचरेकर[7] 11-4, 11-8, 7-11, 15-17, 11-7, 11-3;
19 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
प्रणव घोळकर[1] वि.वि.जय पेंडसे[8] 12-10, 11-9, 7-11, 8-11, 11-8, 11-9;
आदित्य जोरी[4] वि.वि.रामानुज जाधव 11-2, 11-6, 11-7, 11-7;
अरुप साहा वि.वि.नरेन इंदानी[6] 11-7, 11-4, 11-6, 11-8;
वेदांग जोशी[7] वि.वि.सनत जैन 9-11, 11-8, 11-3, 11-7, 11-7;
19 वर्षांखालील मुली:
पृथा वर्टीकर[1] वि.वि.रुचिता दारवटकर 11-8, 11-3, 11-5, 11-4;
निधी भांडारकर[5] वि.वि.वैष्णवी देवघडे[4]11-4, 11-4, 11-9, 6-11, 8-11, 11-6;
राधिका सपकाळ[3] वि.वि.आशिका शर्मा[6]11-8, 11-9, 6-11, 11-9, 11-6;
धनश्री पवार[2] वि.वि.मयुरी ठोंबरे 13-11, 11-7, 11-9, 12-10.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोज मारतोयं १५० षटकार! भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या फलंदाजाचा भयानक प्लान
आता चीनलाही खेळायचय ‘जबरा’ क्रिकेट! भारताकडेच मागितली ‘या’ गोष्टीची मदत
एक शतक अन् आयसीसी क्रमवारीत गिलला थेट ४५ स्थानांचा फायदा! वाचा सध्या कोणत्या स्थानावर विराजमान