पुणे। पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी अल्लेपी केरळ मध्ये झालेल्या नॅशनल क्लासिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये ५७ किलो खुल्या महिला गटांमध्ये सुवर्णपदक पटकाविले.
त्यांनी ५७ किलो गटात स्क्वॅटमध्ये तिसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक १३५ किलो वजन उचलले. यानंतर बेंच प्रेस मध्ये ७२.५ किलो, तर डेडलिफ्टमध्ये मध्ये १५६.५ किलो वजन उचलून नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्याचबरोबर एकूण ३६४ किलो वजन उचलून नवा राष्ट्रीय विक्रम रचला.
वडगाव मावळ येथील जिल्हास्तरीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आणि बाबू गेनू कामगार क्रीडा भवन मुंबई राज्यस्तरीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकाविले होते. या स्पर्धांमधून त्यांची नॅशनल क्लासिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड झाली होती.
डॉ. शर्वरी इनामदार म्हणाल्या, अल्लेपी मध्येच २०१७ साली राष्ट्रीय स्पर्धा झाल्या होत्या, त्या वेळी समाधानकारक कामगिरी करू शकले नाही. परंतु, यावेळी ५७ किलो खुल्या महिला गटात सुवर्णपदक मिळाले, हे यश खूप विशेष आहे. या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली होती. जम्मू-काश्मीर, हरियाणा, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आदि राज्यांमधील खेळाडूंशी कडवी टक्कर द्यावी लागली, असेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
बेंगलोरने १६ धावांनी जिंकली दिल्लीविरुद्धची लढत; मॅक्सवेल, कार्तिक अन् हेजलवूड विजयाचे शिल्पकार
शालेय विद्यार्थ्यांचा रोईंगमध्ये सहभाग वाढावा यासाठी प्रथमच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन