---Advertisement---

रोहित- रैना तयार केली सीएसके- मुंबईची मिळून जबरदस्त ड्रीम ११

On: मंगळवार, मे 12, 2020 8:23 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा व फलंदाज सुरेश रैनाने आज इंस्टाग्रामद्वारे एकमेकांशी संवाद साधला. यावेळी या दोन खेळाडूंनी चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स संघाची मिळून ड्रीम ११ टीम तयार केली.

ही टीम तयार करताना दोघांनीही आपल्या नावाचा मात्र या संघात समावेश केला नाही. तसेच मुंबईचे ५ तर सीएसकेचे ६ असे मिळुन हा संघ तयार केला.

यात सलामीसाठी त्यांनी मेथ्यू हेडन व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या नावाचा समावेश केला.  तिसऱ्या क्रमांकावर फाफ डुप्लेसी तर चौथ्या क्रमांकावर अंबाती रायडुला या दोघांनी संधी दिली.

पाचव्या स्थानावर किराॅन पोलार्ड या अष्टपैलू खेळाडूला संधी देताना सहाव्या स्थानावरील एमएस धोनीकडे संघाचे नेतृत्त्व दिले.

अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावो यांना या संघात स्थान दिले. तर हरभजन सिंगला आणि जसप्रीत बुमराह यांनाही त्यांनी संघात त्यांनी संधी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---