महा स्पोर्ट्स फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रविवारी अनुभवी टेनिस क्रिकेट समालोचक मनोज बेल्हेकर यांनी जुन्नर तालुक्यातील खेळाडूंची खास ड्रीम ११ तयार केली. एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी या संघातील खेळाडूंची नावं सांगितली.
हा संघ तयार करताना त्यांनी सर्व महाराष्ट्रातील खेळाडू घेण्यापेक्षा केवळ ज्या खेळाडूंबरोबर ते खेळले आहेत किंवा ज्या खेळाडूंना त्यांनी जवळुन पाहिले आहे, त्याच खेळाडूंना यात स्थान दिले.
सध्या क्रिकेट वर्तुळात लाॅक डाऊनमुळे सर्वत्र आजी माजी खेळाडू तसेच समालोचक ड्रीम ११ तयार करत आहे. अशातच मनोज बेल्हेकर यांनी केवळ जुन्नर तालुक्यातील खेळाडूंना घेऊन एक सुंदर संघ तयार केला आहे.
“मला सगळीकडच्या खेळाडूंना घेऊन संघ तयार करणे कठीण जाईल. परंतु मी ज्या तालुक्यात रहातो त्या जुन्नर तालुक्यातील मी ड्रीम ११ नक्कीच सांगु शकतो. माझ्या बरोबर खेळलेले खेळाडू व सध्याचे खेळाडू यांना घेऊन मी हा संघ तयार केला आहे,” असे यावेळी बेल्हेकर म्हणाले.
या संघात त्यांनी गणेश जाधव व आनंद मोढवेसारख्या तालुक्यातील सिनीयर खेळाडूंचा समावेश केला. तसेच या संघातील जवळपास सर्वच खेळाडूंनी टेनिस क्रिकेट एकेकाळी दणाणून सोडले आहे किंवा सध्या ते टेनिस क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत.
समालोचक मनोज बेल्हेकर यांची जुन्नर तालुक्यातील खेळाडूंची ड्रीम ११-
गणेश जाधव, आनंद मोढवे, निलेश पिंगळे, सुमित भंडारी, निलेश खरमाळे, संतोष भालेराव, राजू डावखर, अविनाश रोकडे, विकास वाघमारे, विनोद शेटे, अनिल धांडे, राजू पाटे व अज्जू ब्यापारी.
ट्रेडिंग घडामोडी-
फक्त महाराष्ट्रीय खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११
सचिनला १९०वर बाद दिले असते तर मला दिले नसते जाऊ हाॅटेलवर
एका रनआऊटने झाले होते मैदानात दंगे, ६५ हजार प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर काढून घेतला होता सामना