---Advertisement---

डेब्यू असावा तर असा! मावीने पहिल्याच सामन्यात दाखवला दम; चार बळींसह श्रीलंकेची केली वाताहात

On: मंगळवार, जानेवारी 3, 2023 10:21 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (03 जानेवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे पार पडला. या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज शिवम मावी (Shivam Mavi Debute) याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.‌ आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सादर करत श्रीलंकेला पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या मालिकेत प्रमुख गोलंदाज म्हणून खेळत असलेल्या अर्शदीप सिंग याला सामन्याआधी ठीक वाटत नसल्याने मावीला पदार्पणाची संधी मिळाली. मागील चार वर्षापासून आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघात निवडण्यात आले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने आपल्यावर इतका भरवसा का ठेवला जातो याचा प्रत्यय आणून दिला.

विजयासाठी 163 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. श्रीलंकेच्या गावातील दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या मावीने दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवर चौकार दिला. मात्र, पाचव्या चेंडूवर त्याने पथुम निसंकाचा उत्कृष्ट इनस्विंगवर त्रिफळा उडवत कारकिर्दीतील पहिला बळी मिळवला. त्यानंतर डावातील चौथे शतक टाकण्यासाठी आल्यानंतरही त्याला धनंजय डी सिल्वाने तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर चौकार वसूल केले. मात्र, त्याने पुन्हा एकदा पुन्हा पुनरागमन करत पाचव्या चेंडूवर त्याला फसवत संजू सॅमसन याच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याला थेट पंधराव्या षटकात गोलंदाजीची संधी मिळाली. संघाला निराश न करता आक्रमक फटकेबाजी करत असलेल्या वनिंदू हसरंगा याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर अखेरच्या षटकातही त्याला बळी मिळवण्यात यश आले. त्याने 4 षटकात केवळ 22 धावा देत 4 बळी आपल्या नावे केले.

तत्पूर्वी, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन (37), कर्णधार हार्दिक पंड्या (29),  दीपक हुडा (41 नाबाद) व अक्षर पटेल (नाबाद 31) यांच्या योगदानाच्या जोरावर 5 बाद 162 धावा बनवल्या.

(Dream Debute For Shivam Mavi In T20I)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशानच्या नवीन वर्षाची सुरुवात दिमाखात! श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप देत मोडला विस्फोटक सेहवागचा विक्रम
फलंदाजाला गेला नडायला, पण नियम माहिती नसल्याने झम्पाची झाली फजिती; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---