रशिया। क्रोएशियाचा स्ट्रायकर मारियो मांडझूकिक याने जन्मभूमीपासून 4000 किमी दूर असून त्याच्या चाहत्यांचे 3000 पौंड ड्रिंक्सचे बील चुकते केले.
स्लावोनस्की ब्रोड येथे मांडझूकिकचा जन्म झाला आहे. येथील ज्या चाहत्यांनी उपांत्यपूर्व फेरीतील रशिया विरुद्धचा सामना बघितला त्यांच्या ड्रिंक्सचे बील मी चुकते करणार असे त्याने आश्वासन दिले होते.
फिश्ट ऑलिंपिक स्टेडियमवर झालेला हा सामना क्रोएशियाने पेनल्टीमध्ये 4-3ने जिंकला.
क्रोएशियाच्या 24सॅटा या साईटनुसार, रशिया विरुद्धच्या सामन्याच्या वेळी ब्रोड येथील मैदानावर 100पेक्षा अधिक चाहते उपस्थित होते. या सगळ्यांचे जवळ-जवळ 25000कुना म्हणजेच 3000 पौंड एवढे बील झाले होते.
https://twitter.com/ADP1113/status/1016178276992278528
मांडझूकिक याची अशी समाजसेवा करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने अशी मदत केली आहे. मागच्या वर्षीच त्याने स्थानिक अग्नीशमन दलासाठी 18,000 पौंड दिले होते.
तसेच चाहत्यांना अशी अपेक्षा आहे की, संघ विश्वचषक घरी घेऊन येईल.
क्रोएशिया संघाचा या स्पर्धेतील आजपर्यंतचा खेळ उत्तम झाला आहे. साखळी फेरीत अर्जेंटीना या बलाढ्य संघाला 3-0 असे पराभूत करत सलग या स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला.
आज होणाऱ्या उपांत्य फेरीतील त्यांचा सामना इंग्लंडशी आहे.
हे दोन्ही संघ या सामन्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण क्रोएशिया 1998ला म्हणजेच 20 वर्षांपूर्वी आणि इंग्लंडचा संघ 28 वर्षांपुर्वी 1990ला उपांत्य सामना खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषक: उपांत्य फेरीत आज क्रोएशिया लढणार इंग्लंडशी
–२०व्या मिनीटाला गंभीर दुखापत झालेला खेळाडू देशासाठी १२०मिनीटे लढला
–अगदी भारतातील दिग्गजांनीही दिल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा