दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) लूसिया किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. डू प्लेसिसला पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो त्या स्पर्धेतून बाहेर झाला होता. त्यानंतर डू प्लेसिस आता पूणपणे ठीक झाला आणि मैदानावर पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी तयार झाला आहे. सीपीएल खेळल्यानंतर तो आता १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी यूएईला रवाना होणार आहे. तत्पूर्वी डू प्लेसिसने आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळण्याचा अनुभव शेअर केला आहे.
डू प्लेसिस म्हणाला, “आम्ही पहिल्या टप्प्यात चांगले क्रिकेट खेळले होते आणि आशा आहे की आम्ही तोच फार्म पुढेही निरंतर ठेवू. पहिल्या टप्प्यात मी चांगले प्रदर्शन केले होते आणि आशा आहे की, पुढे जेथे मी सोडले होते, तेथूनच सुरुवात करेल. मागच्या हंगामापेक्षा या हंगामात आमचा संघ यावेळी जास्त संतुलित आहे.”
डू प्लेसिसने २०२१ च्या पहिल्या टप्प्यामध्ये चांगले प्रदर्शन केले होते. त्याने पहिल्या टप्प्यात १४५.४५ च्या स्ट्राइक रेटने ३२० धावा केल्या होत्या. त्याच्या अप्रतिम प्रदर्शनामुळे सीएसकेचा संघ विजयाच्या मार्गावर परतला होता. चेन्नई सुपर किंग्जचा संघ सध्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्जने यूएईत जाऊन त्यांच्या सरावालाही सुरुवात केली आहे.
फाफ डू प्लेसिसने आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीसोबत खेळण्याचा अनुभव शेअर केला आहे. तो म्हणला, “सीएसकेचा संघ नेहमीच खूप मजबूत राहिला आहे. ते नेहमी चांगल्या नेतृत्वांना संघात आणण्याचा प्रयत्न करतात. एक वेळ अशी होती जेव्हा आमच्या संघात चार आंतरराष्ट्रीय कर्णधार एकत्र खेळत होते. ते स्मार्ट क्रिकेटपटूंवर विश्वास दाखवतात आणि अनुभवी खेळाडूंना त्यांच्याबरोबर खेळवतात. धोनीच्या नेतृत्वात खेळणं माझ्यासाठी मोठा फॅक्टर असतो. तो सामन्यात सर्वात जास्त प्रभाव टाकतो. मागचे १० वर्ष माझ्यासाठी खूप चांगले राहिले आणि मी खूपकाही शिकलो आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या विराट ब्रिगेडविरुद्ध ‘या’ योजनेसह उतरलाय इंग्लंड संघ
हेडिंग्ले कसोटी जिंकण्याची भारताला अजूनही संधी, ‘ही’ आकडेवारी देतेय टीम इंडियाला दिलासा
झिम्बाब्वेची विजयी सुरुवात, पहिल्या टी२०त आयर्लंडवर ३ धावांनी दणदणीत विजय