सध्या सुरु असलेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा आज साखळी फेरीतील शेवटचा सामना शी युकीविरुद्ध होणार आहे.
या स्पर्धेत याआधी श्रीकांतला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. श्रीकांतचा पहिला सामना जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या डेन्मार्कच्या विकटोर अक्सेल्सनशी तर दुसरा सामना तैवानच्या चाउ तिएन चेनशी झाला होता.
श्रीकांतचा आजचा सामनाही सोपा नसेल. कारण शी युकीने साखळी फेरीतील पहिले दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचा पहिला सामना चाउ तिएन चेन विरुद्ध झाला होता आणि दुसरा सामना विकटोर अक्सेल्सनविरुद्ध झाला होता.
श्रीकांतचे या स्पर्धेतील आव्हान संपले असले तरी त्याचा आजचा सामना जिंकून विजयी शेवट करण्याचा प्रयत्न असेल. श्रीकांत ब गटात शेवटच्या स्थानी आहे.