कालपासून सुरु झालेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा या स्पर्धेमधील दुसरा सामना ताइवानच्या चाउ टीएन चेनशी आहे.
श्रीकांतचा काल पहिला सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या विक्टर एक्सेसनशी होता. या सामन्यात ०-२ अश्या फरकाने श्रीकांतला पराभव स्वीकारावा लागला. तर चाउ टीएन चेनचा पहिला सामना चायनाच्या यूकी शि या खेळाडूशी होता. या सामन्यात चाउ टीएन चेनला ०-२ अश्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
दोन्ही खेळाडूंनी या स्पर्धेतील पहिला सामना गमावलेला असल्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. त्यामुळे हा सामना नक्की कोण जिंकेन याची उत्सुकता सर्वाना असेन.
जागतिक क्रमवारीत श्रीकांत चौथ्या स्थानावर आहे तर टीएन चेन चोऊ सातव्या स्थानावर आहे.
हा सामना दुपारी ४:३० वाजता सुरु होईल.