---Advertisement---

Dubai Open: श्रीकांतचा सलग दुसरा पराभव, उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या

---Advertisement---

काल पासून सुरु झालेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा आज सलग दुसरा पराभव झाला आहे. त्याला तैवानच्या चाउ तिएन चेनने पराभूत केले.

४३ मिनिटे चाललेल्या या लढतीत पहिल्या सेटमध्ये श्रीकांतची सुरुवात खराब झाली होती, त्याला चेनने पिछाडीवर ठेवण्यात यश मिळवले होते. पण श्रीकांतनेही चांगली लढत देऊन हा सेट १३-२० वरून सलग ५ गुण जिंकत सेट एका क्षणाला १८-२० असा केला होता पण अखेर चेनने मॅच पॉईंट जिंकत सेट जिंकला आणि सामन्यात आघाडी मिळवली.

दुसऱ्या सेट मध्ये मात्र श्रीकांतने चांगला खेळ केला त्याने सुरवातीपासूनच आघाडी मिळवली होती. या सेटच्या मध्यापर्यंत ११-९ असा श्रीकांत आघाडीवर होता. परंतु नंतर चेनने ही आघाडी मोडून काढत एका क्षणाला सेट १७-१७ असा बरोबरीचा केला आणि अखेर श्रीकांतला संधी न देता हा सेटही १८-२१ अशा फरकाने जिंकत सामानही जिंकला.

सलग दोन पराभवांमुळे श्रीकांतच्या या स्पर्धेच्या पुढच्या फेरीत जाण्याच्या आशा मावळल्या आहेत. तो सध्या ब गटात शेवटच्या स्थानी आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment