रोहित शर्मा याने मुंबई इंडियन्ससाठी दिलेले योगदान नक्कीच मोठे आहे. पण शुक्रवारी (15 डिसेंबर) फ्रँचायझीने रोहितकडून संघाचे कर्णधारपद काढून घेतले. हार्दिक पंड्या हा आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे. चाहत्यांना फ्रँचायझीचा हा निर्णय पटला नाही, असेच सोशल मीडियावर दिसते. अशातच रोहितची पत्नी रितिका हिच्या मनातील खंत अप्रत्यक्षपणे पाहायला मिळत आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ सर्वात यशस्वी राहिले आहेत. मागच्या 16 आयपीएल हंगामांपैकी 10 हंगामांमध्ये मुंबई आणि चेन्नई या संघांनी विजेतेपद जिंकले. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मुंबईला, तर एमएस धोनी (MS Dhoni) याने सीएसकेला प्रत्येकी पाच-पाच आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिल्या. धोनी आगामी आयपीएल हंगामात देखील सीएसकेचे नेतृत्व करताना दिसू शकतो. पण शुक्रवारी (15 डिसेंबर) हे स्पष्ट झाले की, रोहित आगामी आयपीएल हंगामात मुंबईचा कर्णधार नसेल. फ्रँचायझीने रोहितच्या ऐवजी पुढच्या हंगामात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला संघाचा कर्णधार बनवले आहे. रोहितच्या लाखो चाहत्यांप्रमाणेच त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिदेखील फ्रँचायझीच्या या निर्णयावर नाराज दिसत आहे. सोशल मीडियावर केलेली एक कमेंट्स रितिकाबाबतच्या चर्चांचे कारण ठरत आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहित शर्माचा प्रवास संपला आहे. अशात मुंबईचा कट्टर प्रतिस्पर्धी संघ चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडियावरून रोहितसाठी खास पोस्ट शेअर केली गेली. या ईस्टाग्राम रिलमध्ये धोनी आणि रोहितने कर्णधार म्हणून सोबत घालवलेले क्षण दाखवण्यात आले आहेत. रितिका सजदेह हिने या पोस्टवर सीएसकेच्या जर्सीप्रमाणे पिवळ्या रंगाचा हर्ट इमोजी पोस्ट कमेंट केला आहे.
View this post on Instagram
केवळ या एका कमेंटमुळे रोहित भविष्यात सिएसकेसाठी खेळणार, अशा चर्चाही काही चाहत्यांनी सुरु केल्या आहेत. भविष्यात रोहित मुंबईसाठी खेळणार की नाही, हे इतक्यात सांगता येणार नाही. पण रोहित आयपीएल 2024 मध्ये मात्र सीएसेचा भाग होऊ शकणार नाही. कारण खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करण्याची शेवटची तारिख 12 डिसेंबर होती. अशात आगामी हंगामात रोहित मुंबईसाठीच खेळणार, हे मात्र नक्की. (Due to Ritika’s comments on CSK’s post, there have been rumors about Rohit Sharma )
महत्वाच्या बातम्या –
अखेर मुंबईकर जाफरने सोडले मौन, रोहितला कर्णधारपदावरून हटविल्यावर निशाणा साधत म्हणाला, ‘इतक्या लवकर…’
रोहित ठरला क्रिकेटच्या मैदानातील शिवराज सिंग चौहान; आपल्यांनीच सोडली साथ! वाचा सविस्तर…