दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अनुक्रमे मध्य आणि उत्तर विभागाने बाजी मारली आहे. उत्तर विभागाने ईशान्य विभागाचा 511 धावांनी पराभव केला, तर मध्य विभागाने पूर्व विभागाचा 170 धावांनी पराभव केला. या सामन्यात एकूण 11 बळी घेणारा मध्य विभागाचा सौरभ कुमार सामनावीर ठरला. त्याने सामन्याच्या चौथ्या डावात 8 बळी घेतल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात 150 धावा करणाऱ्या उत्तर विभागाच्या निशांत सिंधूला सामनावीर किताब देण्यात आला.
मध्य विभाग विरुद्ध पूर्व विभाग
पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत मध्य विभागाने चौथ्या दिवशी 170 धावांनी सामना सहज जिंकला. मध्य विभागाच्या विजयात सौरभ कुमारने महत्त्वपूर्ण योगदान दिले. चौथ्या दिवशी मध्य विभागाकडून सौरभ कुमारने 8 बळी घेतले. तर आवेश खान आणि शिवम मावी यांनी 1-1 गडी बाद केला. पूर्व विभागाने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 6 बाद 69 या धावसंख्येवरून सुरुवात केली होती. परंतु त्यांचा 129 धावांत गुंडाळला गेला. मध्य विभागाने हा सामना जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. जेथे त्यांचा सामना पश्चिम विभागाशी होईल.
नॉर्थ ईस्ट विरुद्ध उत्तर विभाग
सामन्याच्या चौथ्या दिवशी नॉर्थ ईस्ट विभागाला विजयासाठी 608 धावांची गरज होती. परंतु उत्तर विभागाने नॉर्थ ईस्ट संघाला 154 धावांत गुंडाळले. यासह सामना 511 धावांनी जिंकला. नॉर्थ ईस्टकडून पालजोर तमांगने सर्वाधिक 40 धावा केल्या. उत्तर विभागाकडून पुलकित नारंगने 4, निशांत सिंधूने 2 आणि बलतेज सिंग, हर्षित राणा आणि कर्णधार जयंत यादव यांनी 1-1 बळी घेतले. या विजयासह उत्तर विभागाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले असून, उपांत्य फेरीत त्यांचा सामना दक्षिण विभागाशी चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे.
(Duleep Trophy 2023 Central Zone And North Zone Register Wins In Duleep Trophy 2023)
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? ‘हे’ आहेत पाच पर्याय
अमेलिया-सोफीच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडचा दमदार विजय, श्रीलंकेला 111 धावांनी पत्करावी लागली हार