---Advertisement---

Duleep Trophy Final: वैभव सूर्यवंशीसोबत पहिल्यांदाच घडले ‘असे’, 251 दिवसांची मालिका खंडित!

On: बुधवार, सप्टेंबर 9, 2026 3:37 PM
---Advertisement---

कारकि‍र्दीत पहिल्यांदाच दुलीप ट्रॉफी खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने अपेक्षेप्रमाणे उत्तम कामगिरी केली आहे. त्याने 5 डावांमध्ये 38.40 च्या सरासरीने 192 धावा केल्या. तसेच 2026 च्या या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या 92 राहिली. त्यामुळे तो या स्पर्धेच्या इतिहासात अर्धशतकी खेळी करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला, मात्र एक आश्चर्याची घटना त्याच्याबाबतीत घडली आहे.

चेन्नईमध्ये सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा आज (बुधवार, 9 ऑगस्ट) चौथा दिवस आहे. या सामन्यात पूर्व विभागाने पहिल्या डावात 708 धावसंख्या उभारली, तर प्रत्युत्तरात दक्षिण विभागाचा पहिला डाव 336 धावसंख्येवर संपुष्टात आला. यामुळे पूर्व विभागाचा संघ पुन्हा फलंदाजी करण्यास उतरला, मात्र या डावामध्ये चकित करणारी घटना घडली.

या स्पर्धेत वैभव पूर्व विभागाकडून खेळतो. तो दुसऱ्या डावात सलामीला फलंदाजीसाठी आला असता त्याची 251 दिवसांची मालिका खंडित झाली. ही मालिका त्याच्या नॉकआऊटमध्ये बाद होण्याबाबतशी संबधित आहे.

वैभव दुसऱ्या डावात 16 चेंडूंचा सामना करून केवळ 8 धावा करत बाद झाला. यामुळे त्याच्या 251 दिवसांची खास मालिका संपुष्टात आली. झाले असे की, 2026 मध्ये नॉकआऊट सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद होण्याची युवा फलंदाजाची ही पहिलीच वेळ आहे.

या सामन्याच्या पहिल्या डावात वैभवने 37 चेंडूंत 44 धावा केल्या होत्या. तसेच त्याआधी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दोन डावांमध्ये अनुक्रमे 92 आणि 40 धावा केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---