Ayush Badoni Double Century: आयुष बदोनीच्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर, नॉर्थ झोनने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी रविवारी ईस्ट झोनला पुनरागमनाची संधी दिली नाही आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. (North Zone vs East Zone)
पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतलेल्या नाॅर्थ झोनने दुसऱ्या डावात 2 बाद 388 धावांवरून खेळाला सुरुवात केली. संघाने 4 बाद 658 धावांवर डाव घोषित केला, तेव्हा त्यांची आघाडी 833 धावांची झाली होती. त्यानंतर दोन्ही कर्णधारांनी सामना ड्रॉ घोषित करण्यास सहमती दर्शवली.
आयुष बदोनी 223 चेंडूत 204 धावांवर नाबाद राहिला, तर कन्हैया वधावन 23 धावांवर नाबाद राहिला. बदोनीने फलंदाजी सुरू ठेवण्याच्या संघाच्या निर्णयाचा पुरेपूर फायदा घेत, आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक पूर्ण केले. (Ayush Badoni double century 2025)
शनिवारी 56 धावांवर नाबाद असलेल्या या उजव्या हाताच्या फलंदाजाने 93 धावांवर षटकार मारला आणि त्यानंतर 1 धाव घेऊन 123 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले.
कर्णधार अंकित शर्मा अवघ्या 2 धावांनी द्विशतकापासून हुकला. 168 धावांवरून दिवसाची सुरुवात करणाऱ्या अंकितने 198 धावांवर वेगवान गोलंदाज मुख्तार हुसेनच्या चेंडूवर मिड-ऑनला सूरज जयस्वालकडे झेल दिला. (Ankit Sharma 198 runs Duleep Trophy)
अंकित बाद होण्याआधी त्याने बदोनीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी केली. या विकेटनंतरही ईस्ट झोनच्या गोलंदाजांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर मैदानात आलेल्या निशांत सिंधूने (91 चेंडूत 68 धावा) बदोनीसोबत 157 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 600 च्या पुढे नेली.
बदोनीचे द्विशतक पूर्ण झाल्यावर संघाने डाव घोषित केला. बदोनीने 13 चौकार आणि 3 षटकार मारले, तर सिंधूने 2 चौकार आणि 5 षटकार मारले. पहिल्या डावात हॅट्ट्रिकसह 5 विकेट्स घेणाऱ्या नाॅर्थ झोनचा गोलंदाज आकिब नबीला ‘सामनावीर’ (Man of the Match) म्हणून घोषित करण्यात आले. (Akib Nabi man of the match hat-trick)
सामना ड्रॉ झाल्यानंतर नाॅर्थ झोनचा कर्णधार अंकित म्हणाला, “जर आम्हाला वाटले असते तर आम्ही निकालासाठी जाऊ शकलो असतो. पण पहिल्या डावात मोठी आघाडी असल्यामुळे आम्ही तसा प्रयत्न केला नाही. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनाही (आशिया कपच्या आधी) शक्य तितके ताजेतवाने ठेवायचे होते.” (Ankit Sharma Statement)






