सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना पर्थच्या मैदानावर रंगला आहे. पर्थच्या मैदानावर दोन्ही संघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचे पारडे जड राहिले. दरम्यान भारताचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) दोन्ही खेळाडूत दुसऱ्या दिवशी बाचाबाची झाली.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी चांगली सुरुवात केली. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली आहे. या भागीदारीत जयस्वाल अधिक आक्रमकपणे खेळत आहे. त्याने नववे अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नव्हते, पण दुसऱ्या डावात त्याने चांगला खेळ केला.
जयस्वालने एका षटकात मिचेल स्टार्कवर अतिशय आक्रमक फलंदाजी केली आणि त्याच्या बाजूने एक-बाऊन्स चौकार मारला. स्टार्क याला साहजिकच आनंदी नव्हता. त्यानंतर स्टार्कने 2 चांगल्या लांबीचे चेंडू टाकले आणि नंतर हसत हसत जयस्वालच्या जवळ गेला. मात्र, जयस्वालला काही फरक पडला नाही. त्याने स्टार्कला टोमणा मारला, “चेंडू खूप हळू येतोय.”
#YashasviJaiswal didn’t hesitate! 😁
“It’s coming too slow!” – words no fast bowler ever wants to hear! 👀
📺 #AUSvINDOnStar 👉 1st Test, Day 2, LIVE NOW! #AUSvIND #ToughestRivalry pic.twitter.com/8eFvxunGGv
— Star Sports (@StarSportsIndia) November 23, 2024
भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 150 धावांत आटोपला. पहिल्या डावात नितीश कुमार रेड्डीने (Nitish Kumar Reddy) सर्वाधिक 41 धावा केल्या होत्या. भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 104 धावात आटोपला. भारताने दुसऱ्या डावात फलंदाजीत ताकद दाखवली आणि दुसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांच्यात पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आता भारतीय संघ 218 धावांनी आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुल-यशस्वीसमोर ‘किंग कोहली’ही नतमस्तक! मैदानावर येऊन ठोकला सॅल्यूट; VIDEO पाहा
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 10 विदेशी गोलंदाज, बुमराहनं मोडला वसीम अक्रमचा रेकॉर्ड!
यशस्वी जयस्वाल बनला कसोटी क्रिकेटचा नवा ‘सिक्सर किंग’, मॅक्युलमचा रेकॉर्ड उद्ध्वस्त!