---Advertisement---

चमीराचा अविश्वसनीय झेल, IPL इतिहासातील सर्वोत्तम झेलपैकी एक! व्हायरल VIDEO एकदा पहाच

On: मंगळवार, एप्रिल 29, 2025 10:20 PM
---Advertisement---

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) 48वा सामना मंगळवारी (29 एप्रिल) दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. दरम्यान दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात झालेल्या सामन्यात दुष्मंथा चमीराने (Dushmantha Chameera) अनुकुल रॉयचा अविश्वसनीय झेल घेतला आणि त्याला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) डावातील शेवटचा षटक मिचेल स्टार्क (Mitchell Starc) टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मिचेल स्टार्कने लेग स्टंपच्या बाहेर नवीन फलंदाज अनुकुल रॉयला एक फुलर चेंडू टाकला. तो चेंडू अनुकुल रॉयच्या बॅटला लागला आणि डीप लॉन्ग लेगकडे गेला. तिथे असलेल्या श्रीलंकेच्या दुष्मंथ चामीराने योग्य वेळी डावीकडे डाईव्ह केला आणि हवेत उडत दोन्ही हातांनी झेल पकडला.

दुष्मंथा चमीराचा हा झेल पाहून क्रिकेटचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर या झेलचे खूप कौतुक केले जात आहे. याला स्पर्धेतील सर्वोत्तम झेल असेही म्हटले जात आहे. यापूर्वी आयपीएल 2025 मध्ये श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसने एक उत्कृष्ट झेल घेतला होता.

या सामन्यात केकेआरसाठी प्रथम फलंदाजी करताना रहमाननल्लाह गुरबाज आणि सुनील नरेन यांनी सलामी दिली. दोन्ही फलंदाजांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. दोन्ही फलंदाज अनुक्रमे 26 आणि 27 अशा धावसंख्येवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने 26 धावांची खेळी केली. तर युवा खेळाडू अंगक्रिश रघुवंशीने केकेआरसाठी सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकारांसह 2 षटकार मारले. रिंकू सिंग 36, आंद्रे रसल 17 धावा यांच्या जोरावर केकेआर संघ 204 धावांचा डोंगर उभारण्यात यशस्वी ठरला. या सामन्यात केकेआरने दिल्लीला 205 धावांचे लक्ष्य दिले.

दिल्लीसाठी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) 4 षटकांत 43 धावा देऊन 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तर अष्टपैलू खेळाडू कर्णधार अक्षर पटेल आणि विपराज निगम यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. दुष्मंथा चमीरा 1 विकेट घेण्यात यशस्वी ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---