---Advertisement---

किती आले, किती गेले पण ब्राव्हो सम BRAVO ! IPL स्पर्धेतील ‘हा’ रेकॉर्ड अखेर ब्राव्होच्या नावावर

On: शुक्रवार, एप्रिल 1, 2022 12:44 AM
Dwyane-Bravo
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मधील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपरजायंट्स (CSKvLSG) या संघांदरम्यान खेळला ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात लखनऊ २११ धावांचा यशस्वी पाठलाग करत, ६ गड्यांनी विजय नोंदवला. एविन लुईसने वादळी अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, या सामन्यात एक बळी मिळवत चेन्नईचा अनुभवी वेगवान गोलंदाज ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) याने एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. ब्रावो आता आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे.

एक नंबर ब्रावो

या सामन्यात चेन्नई संघाला पराभव पत्करावा लागला. इतर गोलंदाजांनी भरपूर धावा लुटवल्या असल्या तरी, ब्रावोने ४ षटकात ३५ धावा देत दीपक हुडाचा महत्वपूर्ण बळी मिळविला. याचसोबत आता ब्रावोच्या नावावर १७१ आयपीएल बळी जमा झाले आहेत. त्याने लसिथ मलिंगाला मागे सोडत ही कामगिरी नोंदवली.

ब्रावो आणि मलिंगा नंतर या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी भारताच्या अमित मिश्रा याचा क्रमांक लागतो. त्याने १६६ बळी मिळवले आहेत. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पियुष चावला व हरभजन सिंग आहेत. त्यांनी १५७ व‌ १५० बळी मिळवले होते. विशेष म्हणजे ब्रावो वगळता इतर सर्व चारही जण आयपीएल खेळत नाही. त्यामुळे ब्रावोची बळींची संख्या आणखी पुढे जाऊ शकते.

दैदिप्यमान राहिली आहे कारकीर्द

ब्रावोने २००८ मध्ये मुंबई इंडियनसाठी खेळताना आपले आयपीएल पदार्पण केले होते. २०११ पासून तो चेन्नई संघाचा भाग आहे. २०१६ मध्ये चेन्नई संघाला निलंबित केल्यानंतर तो दोन वर्ष गुजरात लायन्स संघासाठी खेळला. ब्रावोने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो आयपीएल व काही फ्रॅंचाईजी क्रिकेट खेळताना दिसतो.‌ ५०० टी२० सामने खेळणारा तो पहिला खेळाडू आहे.

महत्वाच्या बातम्या-

चेन्नईसोबत खेळताना लखनौची गोलंदाजी भरकटली पण रेकॉर्डबुकमध्ये झाली एन्ट्री; केएल राहुलला हे विसरणे अशक्य (mahasports.in)

मुंबई इंडियन्समध्ये अखेर ‘सूर्योदय’! राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी धडाकेबाज फलंदाज संघात सामील (mahasports.in)

द ग्रेट धोनी.! LSG विरुद्धच्या सामन्यात MS DHONI कडून कारकिर्दीतील अविस्मरणीय विक्रमाला गवसणी (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---