आयपीएल २०२१ चा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी (१० ऑक्टोबर) पार पडला. दिल्ली संघाने निर्धारित २० षटकात १७२ धावा केल्या. दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कर्णधार रिषभ पंत यांनी दमदार अर्धशतक झळकावली. चेन्नईचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने दिल्लीच्या शिमरॉन हेटमायरला बाद करत एका विक्रमाला गवसणी घातली.
अष्टपैलू ब्रावोने हेटमायरला बाद करत टी२० क्रिकेटमध्ये ५५० व्या विकेटची नोंद केली, तर आयपीएलमधील ही त्याची १६६ वी विकेट ठरली. टी२० प्रकारात तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी इम्रान ताहीर आहे, त्याने ४२० विकेट्स घेतल्या आहे तर तिसऱ्या स्थानी ४१९ विकेट्ससह सुनील नरेन आहे. राशीद खान आणि लसीथ मलिंगा अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. राशीदने ३९२ विकेट्स घेतल्या आहेत, तर मलिंगाने ३९० विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये ड्वेन ब्रावोने १६६ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानी भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा आहे.
तत्पूर्वी, सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु धोनीचा निर्णय पृथ्वी शॉने चुकीचा ठरवला. पृथ्वी शॉने पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. पृथ्वी शॉने ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ६० धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर बाद झाले. मात्र, मधल्या षटकांमध्ये हेटमायर आणि पंतने डाव सावरला. पंतने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. त्याने ३५ चेंडूत ५१ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. पृथ्वी शॉ आणि पंतच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने चेन्नईसमोर १७२ धावांचे आवाहन उभे केले होते. हे आव्हान चेन्नईने १९.४ षटकात पूर्ण करत सामना ४ विकेट्सने खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
-मैदानात पाऊल ठेवताच आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारा धोनी ठरला पहिलाच खेळाडू
-प्रतिस्पर्धी चेन्नई म्हटलं की शॉची बॅट तळपतेच, पाहा खास आकडेवारी
-एक सर्वात युवा, तर एक वयस्कर कर्णधार, पंत-धोनीच्या नावावर पहिल्या क्लालिफायरमध्ये झाले अनोखे विक्रम