---Advertisement---

ब्रावोने शब्द पाळला, आपली बॅट दिली त्या खास व्यक्तीला

On: शनिवार, नोव्हेंबर 24, 2018 3:49 PM
---Advertisement---

ड्वेन ब्रावोचा चाहता वर्ग संपुर्ण जगात आहे. टी२० स्पेशलिस्ट म्हणुन ओळकला जाणार हा खेळाडू जगातील जवळपास सर्वच टी२० लीग खेळतो.

टी१० लीगमधील मराठा अरेबियन्स संघाकडून हा खेळाडू नुकताच खेळला. तेव्हा त्याने शुक्रवारी अफगाणिस्तानच्या एका तरुण क्रिकेटपटूला आपली बॅट भेट दिली.

बेगाॅल टायगर्स विरुद्ध मराठा अरेबियन्स सामन्यापुर्वी ब्रावोने हझरतउल्लाह झाझाईला वचन दिले होते की जर या सामन्यात त्याने अर्धशतक केले तर तो त्याची बॅट हझरतउल्लाहला भेट देणार.

हझरतउल्लाहने या सामन्यात ३५ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता.

याचा फोटो ब्रावोनेच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात या दोघांचा सेल्फी ब्रावोने पोस्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/BqiG7jDn3bj/?utm_source=ig_embed&utm_medium=loading

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment