वेस्ट इंडिज संघाचा माजी विस्फोटक फलंदाज ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) याने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे. तरीदेखील तो जगातील प्रसिद्ध लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येत असतो. ड्वेन ब्रावो मैदानात असताना तो आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने तर चाहत्यांचे मनोरंजन करतच असतो. तसेच आपल्या डान्सने चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नुकताच प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा’ सध्या भारतातच नव्हे, तर जगभरात गाजतोय. या चित्रपटातील ॲक्शन आणि गाणे सध्या चाहत्यांच्या पसंतीचे ठरत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह, सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू देखील या चित्रपटातील गाण्यांवर थिरकताना दिसून येत आहेत. आता या यादीत वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोचे देखील नाव जोडले गेले आहे. (Dwyane Bravo Shrivalli celebration)
ड्वेन ब्रावो सध्या बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. तर झाले असे की, कोमिल्ला विक्टोरियंस संघाची फलंदाजी सुरू असताना १८ वे षटक टाकण्याची जबाबदारी ड्वेन ब्रावोला देण्यात आली होती. या षटकातील पाचव्या चेंडूवर फलंदाज महिदुल इस्लामने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न फसला आणि चेंडू डीप मिड विकेटला असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला आणि तो झेल बाद झाला. दरम्यान फलंदाज बाद झाल्यानंतर ड्वेन ब्रावोने ‘श्रीवल्ली’ स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. अल्लू अर्जुनची ही डान्स स्टेप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
The Champion, @DJBravo47 channels his inner 𝑷𝒖𝒔𝒉𝒑𝒂 🕺🏼 after sending Mahidul Islam Ankon back to the pavilion! 😍
Catch the West Indian legend in relentless #BBPL2022 action for just ₹5, LIVE on #FanCode 👉 https://t.co/OLCsbLuBGA#BPLonFanCode @alluarjun pic.twitter.com/kVlAlvI2x3
— FanCode (@FanCode) January 25, 2022
तसेच ब्रावोने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये तो श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. यामध्ये तो स्विमिंग पुलच्या बाजूला हा डान्स करत आहे. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/djbravo47/reel/CZJUYgqhEET/?utm_medium=copy_link
ड्वेन ब्रावो आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतो. परंतु आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला रिलीज केले आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली आणि रवींद्र जडेजा या ४ खेळाडूंना रिटेन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
हे नक्की पाहा: