---Advertisement---

रेड कार्डच्या स्पर्धेत डायनामाईटसचा युनिक वानवडीवर विजय

On: गुरूवार, मे 26, 2022 3:48 PM
---Advertisement---

पुणे – डायनामाईटस संघाने पीडीएफए फुटबॉल लीग स्पर्धेत आज युनिक वानवडी वर 2-1 असा विजय मिळविला. हार जीत पेक्षा या सामन्यात खेळाडूंच्या धसमुसळ्या खेलाचीच अधिक चर्चा झाली. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आले.

उत्तरार्धात 36व्या मिनिटाला अनिकेत भोसले याने डायनामाईटस साठी दुसरा गोल केला. दहाच मिनिटांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. अखेरीस पंचांनी युनिकाच्य विवियन सुसाई आणि डायनामाईटस च्यांकित बरसकाळे यांना पंचांनी रेड कार्ड दाखवून बाहेर काढले.त्यामुळे दोन्ही संघ दहा दहा खेळाडूंसह खेळले. त्यापूर्वी सामन्याच्या सातव्या मिनिटाला सार्थक तावरे याने डायनामाईटसचे खाते उघडले होते. अर्थात सामन्याच्या चौथ्या मिनिटाला रायन सूसाई याने युनिकला आघाडीवर नेले होते.

स प महाविद्यालयाचे मैदानावर झालेल्या सामन्यात एफ सी महाराष्ट्र संघाने गोलांचा पाऊस पडताना फ्रेंड्स इलेव्हनवर 12-0 असा दणदणीत विजय मिळवला. यात जेफ्री परेरा याने आठ गोल करून विजयात मोठा वाटा उचलला. अनुराग आठवले याने दोन, तर झैने मीर, इशव व्यास यांनी एकेक गोल करून संघाचे विजयाधिक्या वाढवले.
जी गटात दुर्गा स्पोर्टस् अकादमीने कमंडोज ब संघाचा 3-0 असा पराभव केला. ज्ञानेश दुर्गा याने एक, तर प्रथमेश तेहेडा याने दोन गोल केले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘भविष्यात हे नाव…’, एलिमिनेटर सामन्यात शतक ठोकणाऱ्या रजत पाटीदारबद्दल विराटचं मन जिंकणारं विधान

आयपीएलच्या झगमगाटात नवी कसोटी क्रमवारी जाहीर; रोहित-विराट-बुमराहला…

क्या मस्त खेला रे तू! विराटच्या नेत्रदिपक चौकाराचं गांगुली, जय शहाकडून कौतुक, रिऍक्शन कॅमेरात कैद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---