---Advertisement---

MPL 2025: ईगल नाशिक टायटन्स पुन्हा विजयी मार्गावर, सातारा वॉरियर्सचा आणखी एक पराभव

On: शुक्रवार, जून 13, 2025 7:29 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी (13 जून) दुसरा सामना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या ईगल नाशिक टायटन्स व काळाच्या स्थानातील सातारा वॉरियर्स यांच्या दरम्यान खेळला गेला. ईगल नाशिक टायटन्सने 3 गडी राखून हा सामना जिंकत, प्ले ऑफ्सच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले. तर, सातारा वॉरियर्सचा हा चौथा पराभव ठरला.

काही तास आधीच रायगड रॉयल्स विरुद्ध स्पर्धेतील पहिला पराभव स्वीकारलेल्या नाशिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाशिकचा पहिल्या तीनही फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र, त्यांना धावांचा वेग वाढवता आला नाही. अनिकेत पोरवाल याने 25 चेंडूंमध्ये सर्वाधिक 26 धावा केल्या. सातारा संघ 19.5 षटकात 115 धावांवर सर्वबाद झाला. नाशिकसाठी कर्णधार प्रशांत सोलंकी याने सर्वाधिक चार बळी मिळवले. तर, मुकेश चौधरी व रोहन दामले यांनी प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले.

विजयासाठी मिळालेल्या 116 धावांचा पाठलाग करताना अर्शिन कुलकर्णी शून्य व साहिल पारख सहा धावांवर तंबूत परतले. त्यानंतर मंदार भंडारी 22 व सिद्धांत जोशी यांनी 21 धावांचे योगदान दिले. अथर्व काळे, रणजीत निकम आणि रोहन दामले यांनी नाशिकच्या पाठलागात हातभार लावत 16.5 षटकांत विजयी लक्ष पार केले. सातारा संघासाठी राजवर्धन हंगरगेकर याने दोन तर, वैभव दरकुंडे व शुभम मैद यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. चार बळी मिळवणारा नाशिकचा कर्णधार प्रशांत सोलंकी सामनावीर ठरला.

ईगल नाशिक टायटन्स संघाने आतापर्यंत सहा सामने खेळताना पाच विजय मिळवले आहेत. या विजयासह त्यांची प्ले ऑफ्समधील जागा जवळपास निश्चित झाली आहे. तर, सातारा संघाचा पाच सामन्यातील चौथा पराभव आहे. त्यांना प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करायचा असल्यास आता सर्व सामने जिंकावे लागतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---