नागपुर। हार्ड कोर्ट टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत झील देसाई, वैदेही चौधरी, समा सात्विका या मानांकित खेळाडूंनी सहज विजय मिळवत आगेकूच केली.
नागपूर,रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत अव्वल मानांकित झील देसाई हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सौम्या विजचा 6-0, 6-1 असा, तर दुसऱ्या मानांकित रशियाच्या ऍना उरके हिने भारताच्या क्वालिफायर निधित्रा राजमोहनचा 6-3, 6-1 असा सहज पराभव केला. जर्मनीच्या तिसऱ्या मानांकित एमिली सेबोल्ड हिने भारताच्या निधी चिलूमुलाचे आव्हान 6-4, 6-1 असे संपुष्टात आणले. पाचव्या मानांकित वैदेही चौधरीने सोहा सादिकला 6-3, 6-4 असे पराभूत केले.
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या श्रेया तातावर्तीने क्वालिफायर जगमीत कौर ग्रेवालचा 6-3, 5-7, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. हा सामना 2 तास 13 मिनिटे चालला. माजी राष्ट्रीय विजेती साई संहिता चमर्तीने आपल्या अनुभवाचा वापर करत वंशिता पठानियाचा 4-6, 6-3, 6-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. उभारती टेनिसपटू श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती हिने क्वालिफायर शर्मदा बाळूला 6-4, 6-3 असे नमविले.
निकाल: एकेरी: महिला: पहिली फेरी:
वैदेही चौधरी(भारत)[5]वि.वि.सोहा सादिक(भारत)6-3, 6-4;
श्रेया तातावर्ती(भारत)वि.वि.जगमीत कौर ग्रेवाल(भारत)6-3, 5-7, 6-3;
एमिली सेबोल्ड(जर्मनी)[3] वि.वि.निधी चिलूमुला(भारत) 6-4, 6-1;
साई संहिता चमर्ती(भारत)वि.वि.वंशिता पठानिया(भारत)4-6, 6-3, 6-1;
ऍना उरके(रशिया)[2]वि.वि.निधित्रा राजमोहन(भारत)6-3, 6-1;
झील देसाई(भारत)[1]वि.वि.सौम्या विग(भारत)6-0, 6-1;
श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती(भारत)वि.वि. शर्मदा बाळू(भारत)6-4, 6-3;
समा सात्विका(भारत)[7]वि.वि.आदिती अरे(भारत) 7-5, 6-2;
दुहेरी:
जेनिफर लुईखेम(भारत)/मिहिका यादव(भारत)[2]वि.वि.श्रीया अत्तुरू(यूएसए)/प्रत्युशा रचापुडी(भारत) 7-6(2), 6-3;
हुमेरा बहारमूस(भारत)/युब्रानी बॅनर्जी(भारत)वि.वि.कशिश भाटिया(भारत)/बेला ताम्हणकर(भारत)6-3, 2-6, 10-2;
स्टेफनी और(ऑस्ट्रिया)/इलारिया स्पोशेट्टी(इटली) वि.वि.लालित्या कल्लुरी(भारत)/मैथिली मोठे(भारत)7-6(1), 6-1;
वैदेही चौधरी(भारत)/एमिली सेबोल्ड(जर्मनी)[1]वि.वि.स्मृती भसीन(भारत)/सहजा यमालापल्ली(भारत)6-0, 6-2.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितने दिले रहाणे-पुजाराच्या पुनरागमनाचे संकेत; म्हणाला…
युद्धाच्या रणांगणातून क्रीडाविश्वासाठी वाईट खबर; दोन युवा फुटबॉलपटूंचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू