---Advertisement---

मोठी बातमी! विश्वचषक तोंडावर असताना ईडन गार्डनला आग, ड्रेसिंग रुम जळून खाक

eden gardens
---Advertisement---

आयसीसी वनडे विश्वचषक यावर्षी भारतातील 10 स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील पाच महत्वाचे सामने कोलकाताच्या ईढन गार्डन स्टेडियमवर देखील होतील. सध्या ईडन गार्डनच्या नुकतीनकरणाचे काम सुरू असून बुधवारी (9 ऑगस्ट) स्टेडियममध्ये आग लागल्याचे समोर येत आहे.

आगामी वनडे विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियमक मंडळ पूर्ण तयारी करत आहे. याचाच भाग म्हणून विश्वचषक सामने होणाऱ्या 10 स्टेडियमचे नुतनीकरण केले जात आहे. ईडन गार्डन स्टेडियमवर (Eden Garden Stadium) देखील हे काम जोरात सुरू आहे. मात्र, बुधवारी रात्री उशीरा स्टेडियममध्ये अचानक आग लागली. या आगेत स्टेडियमचे नुकसान झाले असून ड्रेसिंग रुम जळून खाल झाल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार बुधवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुरू झाली होती.

आग लागल्याचे समजताच स्टेडियममधून अग्निशमन दलाशी संपर्क साधला गेला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या स्टेडियममध्ये आल्या आणि त्यांनी आग पूर्णपणे विजवली. परंतु त्याआधीच आगेन स्टेडियमचे बरेचसे नुकसान झाले होते. माहितीनुसार ड्रेसिंग रुममध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली होती, ज्याठिकाणी खेलाडूंचे साहित्य ठेवले होते. आगेमध्ये हे साहित्य जळून खाक झाले सोबत ड्रेसिंग रुमचीही दुरावस्थ झाली.

https://twitter.com/KRxtra/status/1689521273041526784?s=20

दरम्यान, ईडन गार्डनवर आगामी वनडे विश्वचषकाचा पहिला सामना28 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. याठिकाणी खेळल्या जाणाऱ्या 5 विश्वचषकाच्या सामन्यांपैकी एक सामना उपांत्य फेरीतील असणार आहे. याच साठी स्टेडियममध्ये मागच्या काही दिवसांपासून नुतनीकरणाचे काम जोरात सुरू आहे. 15 सप्टेंबरपर्यंत स्टेडियमवर एका नव्या रुपात पाहायला मिळणार, असेही सांगितले गेले आहे.

माहितीनुसार आयसीसीचे प्रतिनिधी नुकतेच स्टेडियमध्ये सुरू असलेले काम पाहण्यासाठी भारत दौऱ्यावर आले होते. ईडन गार्डनमधील काम पाहून प्रतिनिधी खुश असल्याचे सांगितले गेले होते. पण पुढच्या महिन्यात आयसीसीचे हे प्रतिनिधी पुन्हा कामाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. (Eden Gardens stadium fire ahead of World Cup 2023)

महत्वाच्या बातम्या –
‘इज्जत वाचली पाहिजे बास…’, भारतीय संघाच्या मियामीतील व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट
मोठी बातमी! विश्वचषकात खेळण्यासाठी विलियम्सन भारतात येणार? हेड कोचच्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---