इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात झालेल्या पाचव्या कसोटी सामन्याचा निकाल भारतीय चाहत्यांसाठी निराशाजनक ठरला आहे. एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे झालेला हा सामना भारताला ७ विकेट्सने गमवावा लागला. यामुळे पाच सामन्यांची ही बहुप्रतिक्षीत मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्या प्रशिक्षणाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाला या सामन्यात झालेल्या चुकांची दुरूस्ती करणे आवश्यक आहेत, असे भारताचा दिग्गज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सुचविले आहे.
इंग्लंडच्या या विजयाचे भारताच्या महान क्रिकेटपटूंनी ट्वीट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. सेहवागने ट्वीटमध्ये लिहीले, ‘भारतासमोर सध्या खूप अडचणी आहेत. पहिल्या सहा फलंदाजांमध्ये फक्त पुजारा आणि पंत हे दोघेच धावा करण्यात यशस्वी ठरत आहेत. जडेजाने चांगली फलंदाजी केली, मात्र वरच्या फळीतील फलंदाजांनी धावा केल्या पाहिजे. चौथ्या डावात गोलंदाजी वाईट झाली.’
Congratulations England on your highest successful run chase.
India have quite a few issues to address,only Pujara & Pant from the top 6 scoring runs and Jadeja batting brilliantly, but need batsman to be in form. Bowling in the fourth innings was absolutely listless #INDvsENG— Virender Sehwag (@virendersehwag) July 5, 2022
सेहवागनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) याने इंग्लंड संघाचे कौतुक करत म्हटले, ‘इंग्लंडचा हा विजय विशेष आहे. जो रुट आणि जॉनी बेयरस्टो यांची बॅट चांगलीच तळपत असून त्यांनी फलंदाजी सोपी केली आहे. हा विजय मिळवल्याने इंग्लंडचे अभिनंदन.’
Special win by England to level the series.
Joe Root & Jonny Bairstow have been in sublime form and made batting look very easy.
Congratulations to England on a convincing victory. @Bazmccullum #ENGvIND pic.twitter.com/PKAdWVLGJo
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 5, 2022
इरफान पठाण (Irfan Pathan) ट्वीट करत म्हटले, ‘हा विजय भारतीय संघाला खूप टोचणार आहे. मात्र इंग्लंड संघाचा हा सोपा विजय होता.’
This victory of team England should hurt Team India. That was too easy… #INDvENG
— Irfan Pathan (@IrfanPathan) July 5, 2022
या सामन्याच्या पराभवानंतर द्रविड म्हणाला, “तिसऱ्या डावामध्ये फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. ही बाब पुनपुन्हा होत असल्याने राष्ट्रीय संघ निवड अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यावर उपाय काढला जाणार आहे.”
सचिन, सेहवान, इरफान प्रमाणेच दक्षिण आफ्रिकेचा धोकादायक फलंदाज एबी डिविलियर्स आणि केविन पीटरसन यांनीही इंग्लंड संघाच्या खेळीचे कौतुक केले आहे.
https://twitter.com/KP24/status/1544268716271075328?s=20&t=yFtUhv9Vh7V1OOi0ZCYV-Q
भारतीय संघ आता इंग्लंड विरुद्ध मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. त्यातील तीन टी२० आणि तीन वनडे सामने असणार आहेत. यातील पहिला टी२० सामना ७ जुलैला साउथम्पटन येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील शेवटचा वनडे सामना १७ जुलैला मॅनचेस्टर येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटला बार्मी आर्मीनेही केलं ट्रोल; लिहिले कोहलीने १८ महिन्यात जेवढ्या धावा नाही केल्या त्यापेक्षा…
टीम इंडियाचा महागुरूही शोधतोय ‘बझबॉल’चा अर्थ, राहुल द्रविडने दिलेले उत्तर होत आहे व्हायरल