रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात शुक्रवार दि. 15 जून रोजी झालेल्या इजिप्त विरूद्ध ऊरुग्वे सामन्यात सामनावीर ठरलेला इजिप्तचा मोहम्मद अल शेनावीने धार्मिक कारणांमुळे सामनावीराचा पुरस्कार स्विकारण्यास मनाई केली.
इजिप्त विरूद्ध ऊरुग्वे सामन्यात इजिप्तच्या मोहम्मद अल शेनावीने उत्कृष्ट गोलरक्षण करत ऊराग्वेच्या चढाईपटूंना सामन्याच्या 89 व्या मिनिटापर्यंत रोखून धरले होते. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार जाहीर झाला होता.
पण या सामनाविराच्या पुरस्काराचे प्रयोजक बडवायजर ही मद्य कंपनी असल्याने त्याने हा पुरस्कार नाकारला.
मोहम्मद अल शेनावीच्या म्हणण्याप्रमाणे इस्लाम धर्मात मद्याला स्पर्श करने; त्याचे सेवन करने निशिद्ध असल्याने हा पुरस्कार नाकारला आहे.
या सामन्यात शेवटच्या क्षणी उरुग्वेच्या जॉस जिमनेझने 89 व्या मिनिटाला गोल करत 1-0 अशा फरकाने पराभूत केले.
2018 फिफा विश्वचषकासाठी इजिप्तचा संघ 1990 च्या विश्वचषकानंतर प्रथमच पात्र झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
–या फुटबॉलवेड्या अवलियाने फिफामध्ये खेळणाऱ्या 32 संघांच्या देशांतून गोळा केल्या बियर
–फिफा विश्वचषक ट्रॉफीची अनोखी कहानी….