रशियामध्ये होत असलेली फिफा विश्वचषक 2018 स्पर्धा हळुहळु पुढे सरकत आहे. या विश्वचषकाच्या निमित्ताने मैदानातही आणि मैदानाबाहेरही विविध घडामोडींना वेग आला आहे.
मैदानाबाहेर चाहते हे नानाविविध प्रकारे आपल्या संघाला पाठींबा देत आहे. काही चाहत्यांनी आपल्या घराला आपल्या आवडत्या संघाचा रंग दिला आहे तर काही चाहत्यांनी कर्ज काढून सामने पहायला मोठी स्क्रीन खरेदी केली आहे.
याच बरोबर रशियातील फुटबॉल मैदानावरही अनेक विक्रम होत आहेत.
सोमवार दि. 25 जूनला झालेल्या इजिप्त वि. सौदी अरेबिया या सामन्यात इसाम अल हदारी या इजिप्तच्या गोलकिपरने मैदानावर पाय ठेवताच अनोखा विक्रम केला.
आपला पहिलाच विश्वचषक खेळणारा 45 वर्षीय इसाम अल हदारी फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वयस्कर फुटबॉपटू आणि गोलकिपर ठरला.
यापूर्वी कोलंबियाचा गोलकिपर फर्याड मॉनड्रॅगन हा विश्वचषकात खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता.
फर्याड मॉनड्रगन 2014 साली फिफा विश्वचषकात कोलंबियाकडून सहभागी झाला होता त्यावेळी त्याचे वय 43 होते.
इजिप्त वि. सौदी अरेबिया सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परीषदेत इसाम अल हदारी म्हणाला, ” प्रत्येक खेळाडूला विक्रम करणे आवडते. हा सन्मान फक्त माझाचं नाही तर पूर्ण इजिप्तचा आहे.”
या सामन्यात इजिप्तचा सौदी अरेबियाने 2-1 अशा फरकाने पराभव केला.
आपल्या पहिल्या विश्वचषक विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेला इजिप्त फक्त तिसऱ्यांदा विश्वचषकात खेळत आहे.
सौदी अरेबियाकडून झालेल्या पराभवामुळे इजिप्तचे फिफा विश्वचषक 2018 मधील आव्हान संपुष्टात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-हा खेळाडू म्हणतो….धोनीपेक्षा जाॅश बटलर लई भारी!
-होय, मास्टर ब्लास्टर सचिन चुकला…..