---Advertisement---

दुसरी कसोटी: भारताने लंकेला दिला फॉलो-ऑन, श्रीलंका येणार परत फलंदाजीला !

On: शनिवार, ऑगस्ट 5, 2017 12:28 PM
---Advertisement---

कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला ४९३ धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. लंकेचा पहिला डाव १८३ धावांत संपुष्टात आला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने श्रीलंका संघाला फॉलो-ऑन दिला आहे.

विराट कोहलीने कर्णधार असताना फॉलो-ऑन देण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. भारतीय कर्णधारांमध्ये सर्वाधिक वेळा फॉलो-ऑन हा मोहम्मद अझरुद्दीन (७), सौरव गांगुली(४), एमएस धोनी(४), सुनील गावसकर(३), राहुल द्रविड(३) आणि विराट कोहली(३) यांनी दिला आहे.

भारतीय माऱ्यापुढे एकही लंकन खेळाडू विशेष तग धरू शकला नाही. आज फिरकी गोलंदाजांबरोबर वेगवान गोलंदाजही चमकले. आज सकाळच्या सत्रात श्रीलंकेच्या ८ विकेट्स पडल्या. भारतीय गोलंदाजांमध्ये भारतीय गोलंदाजात अश्विनने ५ जडेजाने २ उमेश यादव १ आणि मोहम्मद शमी २ यांनी विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेकडून निरोशन डिकवेल्लाने सर्वोच्च धावसंख्या उभारताना ५१ धावांची खेळी केली. भारताने पहिल्या डावात एवढी मोठी आघाडी घेण्याची ही तिसरी वेळ आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment