भारतीय संघानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2024 टी20 विश्वचषक जिंकला. तब्बल 13 वर्षांनंतर टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. यामुळे देशभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे.
विश्वचषक जिंकल्यानंतर संसदेत टीम इंडियाचं अभिनंदन करण्यात आलं. लोकसभेत सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेत उपराष्ट्रपती जयदीप धनखर यांनी रोहित ब्रिगेडचं अभिनंदन केलं. भारतीय संघ गुरुवारी (4 जुलै) पहाटे ट्रॉफीसह मायदेशी परतला. यानंतर संघानं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर आता टीम मुंबईसाठी रवाना झाली आहे. येथे सायंकाळी विजयी परेडचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, बातमी समोर आली आहे की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील 4 खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांना महाराष्ट्र विधानसभेत बोलावलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या चौघांना उद्या (5 जुलै) महाराष्ट्र विधानसभेत आमंत्रित केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी भारतीय संघाची भेट घेतली. यावेळी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह देखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी भारतीय संघाचं आपल्या निवासस्थानी जोरदार स्वागत केलं. याचा व्हिडिओ समोर आला आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
INDIAN TEAM MEETING PM NARENDRA MODI. ????????
– A Proud moment…!!!! pic.twitter.com/3sOZkG9An6
— Johns. (@CricCrazyJohns) July 4, 2024
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाला फोनवर शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींनी 29 जून रोजी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन भारतीय संघातील खेळाडूंचं अभिनंदन केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास व्हिडिओ आला समोर
टीम इंडियानं बार्बाडोसहून ज्या विमानानं प्रवास केला, त्यानं बनवला मोठा विक्रम! जाणून घ्या
तुम्ही वानखेडेवर टीम इंडियाचा विजयोत्सव प्रत्यक्ष पाहू शकता का? पाहा काय आहे प्रोसेस






