---Advertisement---

या पाच पात्रता असतील तरच होता येणार टीम इंडियाचा नवा निवडकर्ता; बीसीसीआयने घातलीये अट

Team India in T20 WC 2022
---Advertisement---

नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची सुरुवात आता झाली असून, बीसीसीआयने संपूर्ण निवड समितीच अध्यक्षांसह बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर बीसीसीआयने लगेच नव्या निवडसमितीसाठी अर्ज देखील मागवले आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1593628505589264384?t=Rywy5sdPhETIcH3H06Z2IA&s=19

 

टी20 विश्वचषकातील पराभवामुळे हादरलेल्या बीसीसीआयने आपला पहिला कठोर निर्णय शुक्रवारी (18 नोव्हेंबर) घेतला. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वातील निवड समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेत असल्याचे बीसीसीआयने म्हटले. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा हे होते. तर, उत्तर विभागाचे प्रतिनिधी म्हणून हरविंदर सिंग, पूर्व विभागाचे प्रतिनिधी देवाषिश मोहंती व दक्षिण विभागाचे प्रतिनिधी सुनील जोशी यांचा या निवड समितीत समावेश होता. पश्चिम विभागाचे प्रतिनिधी ऍबे कुरूविला यांचा कार्यकाळ या वर्षाच्या सुरुवातीला संपला होता. त्यानंतर ती जागा रिक्त होती.

या सर्वांची हकालपट्टी केल्यानंतर आता नव्या निवड समितीसाठी अर्ज मागविले आहेत. या निवड समितीत प्रत्येक विभागाचा एक अशा 5 सदस्यांचा समावेश असेल. त्यासाठी बीसीसीआयने काही अटीदेखील ठेवल्या आहेत.

निवड समिती सदस्य पदासाठी अर्ज करणारा व्यक्ती भारताचा माजी क्रिकेटपटू असणे आवश्यक आहे. त्याने सात कसोटी किंवा 30 प्रथम श्रेणी सामने खेळले असावे. किंवा 10 वनडे व 20 प्रथम श्रेणी सामने खेळणे गरजेचे आहे. तसेच, सदर उमेदवार हा पाच वर्षांपूर्वी क्रिकेट मधून निवृत्त झालेला असावा. या सर्व गटात बसणारा उमेदवारच अंतिम मुलाखतीसाठी पात्र ठरेल. सर्व उमेदवारांना आपला अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 28 नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत देण्यात आली आहे.

(Eligibility Criteria For New BCCI Selection Committee Members)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: विश्वचषकातील पराभवाचे खापर फोडत बीसीसीआयने बरखास्त केली संपूर्ण निवडसमिती
‘त्याला मी रोखणार नाही, पण…’, आयपीएल 2023मधून बाहेर पडणाऱ्या कमिन्सचे ‘या’ अष्टपैलूबद्दल वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---