भारतीय संघाचा फलंदाज मुरली विजयने काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत संवाद साधला होता. यामध्ये त्याने खुलासा केला होता की, त्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एलिसी पेरीबरोबर डिनर डेटवर (Dinner Date) जायचे आहे. ती खूप सुंदर आहे. यावर त्याला पेरीने प्रत्युत्तरही दिले होते.
नुकतेच सोनी स्पोर्ट्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पेरीला विचारण्यात आले होते की, ती विजयच्या (Murali Vijay) ऑफरबद्दल काय विचार करत आहे? त्यावेळी ऑस्ट्रेलियाची महिला स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू पेरीने म्हटले होते की, “मुरली विजय बिल भरणार आहे. प्रशंसा ऐकून आनंद झाला.”
खरंतर यापूर्वी विजयला २ अशा क्रिकेटपटूंची नावे विचारली होती, ज्यांच्याबरोबर त्याला डिनरला जायला आवडेल. यामध्ये एक नाव हे भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचे होते. तर दुसरे नाव हे ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसी पेरीचे (Ellyse Perry) होते. विजय म्हणाला होता की, त्याला धवन आणि पेरीबरोबर डिनरला जायचे आहे.
धवनबरोबर डिनरला जाण्यामागील कारण सांगत विजय म्हणाला होता की, “धवन खूप मस्ती करतो. तसेच धवन हिंदीमध्ये बोलणार आणि मी तमिळमध्ये बोलणार.” तर पेरीबरोबर डिनरला जाण्यामागील कारण सांगत विजय म्हणाला होता की, “ती खूप सुंदर आहे. त्यामुळे मला तिच्याबरोबर डिनरला जायचे आहे.”
आपल्या आवडत्या फलंदाज संघसहकाऱ्याबद्दल सांगताना विजय म्हणाला की, “गौतम गंभीर आणि वसीम अक्रमबरोबरच विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) माझा आवडता फलंदाजी पार्टनर आहे. जेव्हा सेहवाग सोबत असतो, तेव्हा आपोआपच धावा होतात. हे सर्व दिग्गज खेळाडू आहेत. मी त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत आहे. सेहवागबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करणे सर्वात चांगली संधी होती.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-बीसीसीआयमुळे या लोकांचे पगार अडकले, आता पैसे मिळवायला करताय ही कामं
-डीआरएस सिस्टीम तेव्हा असती तर भारताच्या या गोलंदाजाने घेतल्या असत्या ९०० विकेट्स
-भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटचा ब्रॅडमन