महिला प्रीमियर लीग 2024च्या 11व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. आरसीबीने या सामन्यात 23 धावांनी विजय मिळवला. कर्णधार स्मृती मंधाना आणि एलिस पेरी यांनी आरसीबीसाठी सोमवारी (4 मार्च) चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. स्मृतीने 50 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. तर दुसरीकडे पेरीने 37 चेंडूत 58 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 4 षटकार होते. पेरीचा एक षटकार एवढा जबरदस्त होता, की मैदानात उभ्या असलेल्या गाडीच्या काचेचे तुकटे तुकटे झाले.
उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक यूपी वॉरियर्सने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 3 बाद 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्स संघ 20 षटकात 8 विकेट्सच्या नुकसानावर 175 धावांपर्यंत मजल मारू शकला. आरसीबीसाठी 80 धावांची खेळी करणाही स्मृती मंधाना सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. तसेच एलिस पेरी (Ellis Perry) हिच्या 58 धावा विजयासाठी महत्वाच्या ठरल्या.
आरसीबीच्या डावातील 19व्या षटकात एलिस पेरी हिने एक लांब षटकार मारला. हा चेंडू पेरीच्या बॅटला लागल्यानंतर हवेत चांगलाच वरपर्यंत केला आणि सीमारेषेपार जाऊन थेट टाटा पंच ईवीच्या काचेवर पडला. डब्ल्यूपीएल 2024 साठी टाटा टायटल स्पॉन्सर्स आहेत. त्यामुळेच ही गाडी लीगच्या प्रत्येक सामन्यावेळी मैदानात दिमाखात उभी असते. पण ऑस्ट्रेलियन दिग्गज पेरीच्या षटकारामुळे याच टाटा पंचची काच एका झटक्यात फुटली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
𝘽𝙧𝙚𝙖𝙠𝙞𝙣𝙜 𝙍𝙚𝙘𝙤𝙧𝙙𝙨 + 𝙂𝙡𝙖𝙨𝙨𝙚𝙨 😉
Ellyse Perry’s powerful shot shattered the window of display car 😅#TATAWPL #UPWvRCB #TATAWPLonJioCinema #TATAWPLonSports18 #HarZubaanParNaamTera#JioCinemaSports #CheerTheW pic.twitter.com/RrQChEzQCo
— JioCinema (@JioCinema) March 4, 2024
दरम्यान, पेरीने डावातील 20व्या षटकात दीप्ती शर्मा हिच्या चेंडूवर विकेट गमावली. त्याआधी तीने आरसीबीच्या दुसऱ्या विकेटसाठी स्मृती मंधानासोबत 95, तर तिसऱ्या विकेटसाठी ऋचा घोष हिच्यासोबत 42 धावांची भागीदारी केली. डब्ल्यूपीएल 2024च्या गुणतालिकेचा विचार केला, तर आरसीबी संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाच पैकी तीन सामने आरसीबीने जिंकले आहेत. यादीत पहिल्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स, तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स आहेत. चौथ्या स्थानी यूपी वॉरियर्स, तर पाचव्या स्थानावर गुजरात जायंट्स आहेत. (Ellyse Perry’s powerful shot shattered the window of tata punch)
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy : श्रेयस अय्यरची पुनरागमन सामन्यात निराशा, इतक्या धावा करून झाला आऊट
Ranji Trophy 2024 : परिस्थिती गंभीर, शार्दूल खंबीर, तामिळनाडू विरुद्ध शार्दूल ठाकुरचं दमदार शतक