---Advertisement---

लॉर्ड्स कसोटीतील बहुमुल्य योगदानानंतर रहाणेची कुटुंबासोबत मजा-मस्ती, तुम्हीही पाहा

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 3:14 PM
Rahane Family
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. संघाला या सामन्यात मिळालेल्या विजयामध्ये उपकर्णधार अजिंक्य रहाणेने महत्वाची भूमिका पार पाडली होती. मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी खेळाडूंना काही दिवसांचा कालावधी भेटला आहे. या मधल्या काळात खेळाडू त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. यादरम्यान अजिंक्य रहाणेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अजिंक्य त्याच्या कुटुंबासोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे.

व्हिडिओत अजिंक्य रहाणे त्याची पत्नी रधिका धोपवकर आणि त्याची मुलगी आर्या हे तिघे दिसत आहेत. हे तिघेही एकत्र मजा करत आहेत. हा व्हिडिओ अजिंक्यने स्वत: त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. अजिंक्यने त्याची लहानपणीची मैत्रीण राधिकासोबत २०१४ मध्ये विवाह केला होता.

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने लाॅर्ड्सवरच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या ऐतिहासीक विजयात महत्वाचे योगदान दिले होते. त्याचे या सामन्यातील प्रदर्शन संघासाठी जेवढे महत्वाचे ठरले तेवढेच वैयक्तिक त्याच्यासाठीही लाभदायी ठरले. कारण, मागच्या काही काळापासून तो त्याच्या खराब फाॅर्ममुळे समाजमाध्यमांवर ट्रोल होत होता.

दुसऱ्या कसोटी सामन्यातील ६१ धावांच्या खेळीनंतर अजिंक्यने त्या अनुषंगाने एक इंस्टाग्राम पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “माझी प्रतिक्रिया अशी असते जेव्हा ट्रोलर्स स्वत: ट्रोल होतात.” या पोस्टमध्ये त्याने निळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते. फोटोत त्याच्या चेहऱ्यावर एकप्रकारचा आत्मविश्वास दिसत होता. रहाणेने त्याच्या लाॅर्ड्सवरील दुसऱ्या कसोटी सामन्यातील प्रदर्शनानंतर पुन्हा फाॅर्मात आल्याचे संकेत दिले आहेत.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ १५१ धावांनी विजयी झाला. या सामन्यात एकवेळ अशी आली होती, जेव्हा भारतीय संघ पराजयाच्या वाटेवर होता. संघाच्या या कठीण वेळी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने शतकी भागिदारी करत संघाला मजबुती दिली होती. त्यांची ही खेळी संघाच्या विजयात महत्वपूर्ण ठरली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---