जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. ज्याचा फटका पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला ही बसला होता. काही काळ स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या स्पर्धेचे उर्वरित सामने अबुधाबीमध्ये खेळवण्यात येत आहे. अशातच शनिवारी ( १२ जून ) पेशावर जाल्मी आणि क्वेटा ग्लॅडीएटर्स यांच्यात झालेल्या सामन्यात क्वेटा ग्लॅडीएटर्स संघाकडून खेळत असलेल्या, फाफ डू प्लेसिसला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर देखील जावे लागले होते. अशातच त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर एक भावूक करणारी पोस्ट शेअर केली आहे.
अबुधाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या पेशावर जाल्मी आणि क्वेटा ग्लॅडीएटर्स यांच्यातील सामन्यात, फाफ डू प्लेसिस आणि मोहम्मद हसनेन यांच्यात झेल टिपत असताना जोरदार धडक झाल्याचे पहायला मिळाले होते. ही धडक इतकी जोरदार होती की, फाफ डू प्लेसिसला मैदानाबाहेर जावे लागले होते. ही घटना पाहून जगभरातील क्रिकेट चाहते आश्चर्यचकित झाले होते. तसेच त्याची पत्नी इमारी देखील घाबरली होती.
BREAKING – Faf du Plessis has been sent to hospital for a check-up after he collided with Mohammad Hasnain while fielding in PSL game.#FafduPlessis #PSL pic.twitter.com/RnT9sCPDkz
— amal (@i_auguzto) June 12, 2021
तिने सोशल मीडियावर फाफ डू प्लेसिसचा फोटो शेअर करत लिहिले की, “हे पाहून मला मरणाचा अनुभव होत आहे आणि मला आशा आहे की त्याला त्वरित रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले असतील.”
ही घटना पेशावर जाल्मी संघाची फलंदाजी सुरू असताना घडली होती. डावातील ७ वे षटक सुरू असताना, डेविड मिलरने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा झेल टिपताना फाफ डू प्लेसिस आणि मोहम्मद हसनेन यांच्यात जोरदार टक्कर झाली होती. ही टक्कर इतकी जोरदार होती की, हसनेनचे पाय डू प्लेसिसच्या डोक्याला लागले होते. ज्यामुळे त्याला स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी ‘हे’ दोघे असणार राहुल द्रविडचे साथीदार
शुबमन गिल सलामीला फलंदाजी करताना कधीच खेळणार नाही पहिला चेंडू; ‘हे’ आहे कारण
राज की बात!! डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आर अश्विन करतो ‘या’ रननीतीचा अवलंब