पुणे | नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ) आणि रन बडिज क्लब यांच्या तर्फे चौथ्या एनआयओ व्हिजन अर्ध मॅराथॉन स्पर्धेत 1500 धावपटू सहभागी असुन यामध्ये 500 ब्लॉईंड फोल्डेड धावपटू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा रविवार, दि. 22 जुलै 2018 या दिवशी होणार आहे.
रनबडिज् क्लब या शहरांतील महत्वाच्या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा 3कि.मी, 5कि.मी, 10कि.मी, 15कि.मी आणि 21कि.मी.या प्रकारात होणार आहे. रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथे स्पर्धे
स्पर्धेचा मार्ग रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथुन स्पर्धेला प्रारंभ होणार असून औधच्या दिशेने पुन्हा फिरून रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर असा मार्ग असणार आहे. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ एनआयओ व्हिजनचे डॉ.श्रीकांत केळकर व एनआयओच्या संचालिका जाई केळकर यांच्या हस्ते होणार आहे.
एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धा यावर्षी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. युके मधे डोळेबांधून धावण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–माजी विश्वविजेत्या जर्मनीचा फुटबॉलपटू ठरला वंशभेदाचा शिकार, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून घेतली निवृत्ती