इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 186 धावांनी मोठा पराभव झाला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. इंग्लंडच्या डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टार्कने 28 धावा दिल्या. जे की ऑस्ट्रेलियन वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकणारा गोलंदाज ठरला. लियाम लिव्हिंगस्टोनच्या स्फोटक फलंदाजीमुळे स्टार्कच्या नावावर हा लज्जास्पद विक्रम जमा झाला. लिव्हिंगस्टोनने शेवटच्या षटकात स्टार्कला 4 षटकार आणि 1 चौकार लगावला.
मिचेल स्टार्कच्या आधी ऑस्ट्रेलियन एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकण्याचा विक्रम झेवियर डोहर्टीच्या नावावर होता. ज्याने 2013 मध्ये भारताविरुद्ध एका षटकात 26 धावा दिल्या होत्या. झेवियर डोहर्टीशिवाय कॅमेरून ग्रीन आणि ॲडम झाम्पा यांनीही एका षटकात 26-26 धावा दिल्या आहेत. पण आता क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडविरुद्ध मिचेल स्टार्कच्या नावावर या विक्रमाची भर पडली आहे.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे वनडेतील सर्वात महागडे षटक
28 – मिचेल स्टार्क विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, 2024
26 – झेवियर डोहर्टी विरुद्ध भारत, बेंगळुरू, 2013
26 – कॅमेरून ग्रीन विरुद्ध भारत, इंदाैर, 2023
26 – ॲडम झाम्पा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, 2023
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पावसाच्या व्यत्यामुळे 39-39 षटकांचा खेळ झाला. ज्यामध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 312 धावा केल्या. संघाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात कर्णधार हॅरी ब्रूकसह लियाम लिव्हिंगस्टोनने महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रूकने 58 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 87 धावांची खेळी खेळली. तर लिव्हिंगस्टोनने 3 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकार खेचत 27 चेंडूत नाबाद 62 धावा करत फिनिशिंग टच दिला.
313 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ केवळ 126 धावांवर गारद झाला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा हा चौथा सर्वात मोठा पराभव आहे. संघाला इंग्लंडकडून 186 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा-
IND vs BAN; दुसऱ्या दिवशीही पाऊस पडणार का? काय आहे हवामान अंदाज?
पाच वनडेत केवळ 4 विकेट्स घेणारा गोलंदाज आयपीएल लिलावात ठरणार महागडा? कारण आहे खास
तीन वेळा ‘वर्ल्ड क्रिकेट अंपायर ऑफ द इयर पुरस्कार’ जिंकणाऱ्या अलीम दार यांची निवृत्तीची घोषणा